ऐनवेळी आणखी एक वादग्रस्त ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:37 AM2017-10-15T01:37:59+5:302017-10-15T01:37:59+5:30
महापालिकेतील एका अधिका-यास बडतर्फ काळातील आर्थिक लाभ देण्यात यावेत, या मागणीचा प्रशासकीय ठराव १६ आॅक्टोबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत ऐनवेळी येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेतील एका अधिका-यास बडतर्फ काळातील आर्थिक लाभ देण्यात यावेत, या मागणीचा प्रशासकीय ठराव १६ आॅक्टोबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत ऐनवेळी येणार आहे. यापूर्वी महापौर बापू घडमोडे यांनी हाच प्रस्ताव अशासकीय स्वरूपात ऐनवेळी मंजूर करून घेतला होता. वर्तमानपत्रांमध्ये यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध होताच ठराव रद्द करून ‘अगा जे घडलेच नाही’ असा आव आणण्यात आला होता.
२० जुलै २०१७ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळीत अनेक ठराव घुसडण्यात आले. सोयीचे ठराव मंजूर झाल्याचे दाखविण्यासाठी ठराव क्रमांक ११९२ असा दाखवून उर्वरित ठराव ११९२ आॅब्लिक १ ते ४ असे दाखविण्यात आले आहेत. महापालिकेच्या सभा कामकाज नियमावलीत अशा पद्धतीने ठराव मंजूर होतच नाहीत.
नियम धाब्यावर बसवून मागील काही दिवसांपासून मनपा सभागृहाचे कामकाज सुरू आहे. २० जुलैच्या सभेत एका बडतर्फ अधिका-याला २०१२ ते २०१६ पर्यंतचे आर्थिक लाभ देण्यात यावेत, असा एक ठराव मंजूर झाला होता. या गुपचूप ठरावाची चर्चा बरीच झाल्याने महापौरांनी तो रद्द करून टाकला. आता हाच प्रस्ताव प्रशासनातर्फे सादर करण्यात येत आहे. सोमवार, १६ आॅक्टोबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेत ऐनवेळीत हा ठराव येणार आहे. नगरसचिव विभागाने हा प्रस्ताव स्वीकारल्याचे कळते. बडतर्फ अधिका-यांना शासन आदेशानुसार परत मनपा सेवेत घेण्यात आले आहे.
शासनाकडे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. शासनाकडून काहीच होत नसल्याने शेवटी मनपा सर्वसाधारण सभेकडून आर्थिक लाभ मिळविण्याचे जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.