सिल्लोड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:05 AM2021-09-19T04:05:02+5:302021-09-19T04:05:02+5:30
सिल्लोड : तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सिल्लोड शहरातील शेख जुनेद हाजी अब्दुल सत्तार ...
सिल्लोड : तालुक्याच्या शिरपेचात पुन्हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सिल्लोड शहरातील शेख जुनेद हाजी अब्दुल सत्तार या युवकाची भारतीय शूटिंग बॉल (व्हॉलिबॉल) संघात निवड झाली आहे. भारतीय संघाकडून तो रशिया व नेपाळला खेळण्यासाठी जाणार आहे.
सिल्लोड शहरातील शेख जुनेद हा डी-फार्मसीचे शिक्षण घेत असून तो शालेय जीवनापासून शूटिंग बॉल (व्हॉलिबॉल) स्पर्धेत खेळत आला आहे. तो महाराष्ट्र शूटिंग बॉल संघात खेळत होता. नुकत्याच भद्रा ( राजस्थान) येथे ३९ व्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा झाल्या. यात भारतीय शूटिंग बॉल संघाची निवड करण्यात आली. त्यात त्याची निवड झाली आहे.
-------
प्रेरणादायी ठरणार
जुनेदच्या वडिलांनी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. तर मुलाला खेळासाठी ते कायम प्रोत्साहित करीत आले आहेत. वडिलांच्या विश्वासास सार्थ करीत जुनेद ने घेतलेले कष्ट अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार आहे.
-----
२०१० पासून व्हॉलिबॉल खेळात सहभाग
जुनेदने २०१० पासून शूटिंग बॉल (व्हॉलिबॉल) खेळायला सुरुवात केली. तालुका व जिल्हा संघात तसेच महाराष्ट्र ज्युनियर शूटिंग बॉल संघ सहभाग असा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम पहिल्यांदा महाराष्ट्राच्या संघाने दखल घेतली. त्याला महाराष्ट्र शूटिंग बॉल संघात खेळण्याची संधी २०१९ साली दिली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. महाराष्ट्र संघाकडून त्याने दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई या खेळाचे प्रावीण्य दाखवत बक्षिसे दाखविली.
=
अखेर स्वप्न पूर्ण झाले
भारतीय संघात खेळावे हे स्वप्न होते. ते स्वप्न आज पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या खेळासाठी मला माझे कुटुंब, मित्र यांचे प्रोत्साहन मिळत आहे. माझी भारतीय संघात निवड झाल्याने माझ्या तालुक्याचे, जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नाव देशाबाहेर परदेशात नावारूपास आणायचे आहे. - शेख जुनेद, शूटिंग बॉल राष्ट्रीय खेळाडू
180921\img_20210918_181703.jpg
शेख जुनेद हाजी अब्दुल सत्तार