समृद्धीनंतर आणखी एक राष्टÑीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:40 AM2017-10-30T01:40:43+5:302017-10-30T01:40:55+5:30

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जालना जिल्ह्यातून मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे.

Another prosperous national highway after "samruddhi" | समृद्धीनंतर आणखी एक राष्टÑीय महामार्ग

समृद्धीनंतर आणखी एक राष्टÑीय महामार्ग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गानंतर जालना जिल्ह्यातून मुंबई ते कोलकता हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे. त्यामुळे एकीकडे जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना फायदा होणार असून, रोजगाराच्या संधीबरोबरच दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. तर दुसरीकडे रस्त्यासाठी जमीन संपादन कळीचा मुद्दा ठरणार आहे.
भारतमाला प्रकल्पांतर्गत देशात उभारण्यात येणा-या ४४ पैकी बारा आर्थिक कॉरिडॉरमधील महाराष्ट्रातून जाणार आहेत. यातील मुंबई ते कलकत्ता हा एक हजार ८५४ हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून जाणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गही जालना जिल्ह्यातून ४२ किलोमीटरवरून जाणार आहे. समृद्धीसाठी जिल्ह्यातील ५१२ हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे.
सध्या समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करताना राज्य शासनाला अनेक अडचणी येत आहेत. जमिनीसाठी देण्यात आलेल्या मोबदल्यामध्ये जिल्हानिहाय मोठी तफावत असल्याने जालना जिल्ह्यातील शेतक-यांमधून समृद्धीस जमीन देण्यास विरोध होत आहे. असे असतानाही आणखी एक राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जाणार असल्याने यासाठी किती जमीन संपादित होणार, मोबदला किती मिळेल, हे मुद्दे शेतक-यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्ग सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरूनच बनविण्यात येणार आहे. त्यामुळे यासाठी अधिकची जमीन न घेता केवळ रस्ता रुंदीकरणासाठी सध्याच्या रस्त्यालगतची जमीन संपादित केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग होत असताना आणखी एक महामार्ग कशासाठी, असा सवाल येथील शेतकरी हक्क बचाव व कृती समितीच्या पदाधिका-यांनी उपस्थित केला आहे.
प्रस्तावित मुंबई-कोलकता राष्ट्रीय महामार्गाचे अंतर एक हजार ८५४ किलोमीटर राहणार आहे. सध्या मुंबई ते कोलकता हे अंतर सुमारे एक हजार ९७३ किलोमीटर इतके आहे. नव्या महामार्गात हे अंतर १२० किमीने कमी होणार आहे.
हा महामार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, कारंजा, अमरावती, नागपूर, रायपूर, संभळपूर, देवगड, खरगपूरमार्गे कोलकता असा असेल. यास राष्ट्रीय महामार्ग ‘एनएच सहा’असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: Another prosperous national highway after "samruddhi"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.