मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:44 AM2018-08-20T00:44:36+5:302018-08-20T00:44:51+5:30

सोशल मीडियाचे वेड : संशयपिशाच्चाने उडवले पत्नीचे मस्तक!

 Another victim taken by mobile! | मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

मोबाईलने घेतलेला आणखी एक बळी!

googlenewsNext

श्यामकुमार पुरे
सिल्लोड : ती सतत फोनवर बोलते, व्हॉटस् अ‍ॅप, यूट्यूब बघते, तिचा फोन नेहमी बिझी असतो, म्हणून तिचे कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील, अशा संशयाचे भूत डोक्यात घुसल्याने १४ आॅगस्ट रोजी पतीने चक्क पत्नीचे मुंडके छाटले होते. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून मी पत्नीवर खूप प्रेम करायचो, पण ती सतत फोनवर बोलायची, यामुळे तिचा खून केला. आता खून केल्याचा मला खूप पश्चाताप होतोय, असे आरोपीने पोलिस तपासात सांगितले.
सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथे मागील आठवड्यात ही भयंकर घडली होती. खून करणारा आरोपी पती रवींद्र बनकर सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्यासह मयत विवाहितेचा सासरा साहेबराव रामराव बनकर, दीर अशोक साहेबराव बनकर यांना न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. तर सासू लंकाबाई साहेबराव बनकर, जाऊ शीतल अशोक बनकर या दोघांना हर्सूल कारागृहात पाठविण्यात आले आहे. खून पतीने केला असला तरी तिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करणारे, शारिरीक, मानसिक त्रास देणारे सासू, सासरे, दीर, जाऊ हे सर्वच पोलीस व न्यायालयीन कोठडीत आहेत.
११ वर्षांपूर्वी झाले होते लग्न
देऊळगाव बाजार हे चारशे ते पाचशे उंबऱ्याचे गाव. येथील रहिवासी रवींद्र साहेबराव बनकर (३०) याचे ११ वर्षांपूर्वी मंगला हिच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांच्या संसारवेलीवर सागर (४) व भक्ती (६) ही दोन फुले उमलली. रवींद्र हा शेती व व्यापार करत असे. सर्व काही सुरळीत असताना त्यांच्या संसाराला संशयाच्या भुताने घेरले, अन् ही घटना घडली.
वारंवार समजवूनही ती ऐकत नाही, यामुळे तिचे नक्की कुणासोबत तरी अनैतिक संबंध असतील. तिच्यात बदल होत नाही, ती मला फसवत आहे. समाजात मला तोंड दाखवायला जागा उरली नाही, अशा संशयातून त्याने टोकाचे पाऊल उचलले व रागाच्या भरात रात्री पत्नीचे मुंडके छाटले.
पोलिसांचे कौशल्य
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार, सहायक निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याच दिवशी खुनात वापरलेली धारदार कुºहाड पोलिसांनी जप्त केली व गुन्हा उघडकीस आणला. यापूर्वीही केळगाब येथे बापाने मुलाचा खून केल्याचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला होता.
दोन्ही मुले अनाथ
पती-पत्नी हे सुखी संसाराच्या गाडीचे दोन चाके असतात. यातील एकही वाकले, त्याला तडा गेला तर काय होते. हे या घटनेवरून दिसून येते. मंगलाचा जीव गेला तर सागर आणि भक्ती हे सर्व काही असताना मातृवात्सल्यापासून अनाथ झाले आहेत.

Web Title:  Another victim taken by mobile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :