विद्यार्थिनींचे आज न्यायाधीशांसमोर जबाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2017 10:41 PM2017-05-29T22:41:21+5:302017-05-29T22:45:18+5:30
बीड : प्राचार्यांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणातील विद्यार्थिनींचे जबाब मंगळवारी न्यायाधिशांसमोर होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : प्राचार्यांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणातील विद्यार्थिनींचे जबाब मंगळवारी न्यायाधिशांसमोर होणार आहेत. सोमवारीच हे जबाब होणार होते; परंतु संबंधित विद्यार्थिनींवर मानसिक दबाव आल्याने त्या भयभीत झाल्या आहेत. मानसिकता नसल्याने जबाब पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी पोलिसांकडे केली.
बीडमधील विठाई नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींची प्राचार्य राणा डोईफोडे यांनी छेड काढल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्याद देताना पोलिसांनी बाजू समजून घेतली नाही, तसेच आरोपींवर गंभीर कलम लावले नाहीत, असा आरोप विद्यार्थिनींनी केला होता.
त्यानंतर कलम १६४ नुसार सदर विद्यार्थिनींनी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदविण्याची विनंती केली होती. त्याप्रमाणे त्यांना सोमवारी न्यायालयात बोलाविले होते; परंतु न्यायालयात आल्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून दबाव आल्याने त्यांनी मंगळवारी जबाब घेण्याची विनंती केली.
मंगळवारी न्यायाधिशांसमोर त्या काय जबाब देतात, याकडे लक्ष लागले आहे.