‘अॅट्रॉसिटी’साठी लातुरात महामोर्चा
By Admin | Published: September 25, 2016 11:47 PM2016-09-25T23:47:00+5:302016-09-26T00:09:20+5:30
लातूर : अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी लातुरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमातींचा
लातूर : अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी लातुरात दलित, ओबीसी, भटक्या विमुक्त जाती-जमातींचा लातूर जिल्हा स्वाभिमानी संघर्ष महामोर्चा निघणार आहे. यानिमित्त रविवारी कार्यकर्त्यांची बैठक झाली असून, यात मोर्चा संदर्भात नियोजन करण्यात आले.
येथील डॉ. आंबेडकर पार्कसमोरील शिवशक्ती फंक्शन हॉलमध्ये झालेल्या बैठकीस हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तंटामुक्त समित्या बरखास्त करा, स्पर्धा परीक्षेतील समांतर आरक्षणाचा गोंधळ थांबवा, ओबीसी भटक्या विमुक्तांना लोकसंख्येच्या तुलनेत विधानसभा, लोकसभेत आरक्षण द्यावे आदी मागण्या आंदोलनकर्ते करणार आहेत. १५ नोव्हेंबर रोजी आयोजित स्वाभिमानी संघर्ष मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.