औरंगाबादच्या घाटीत प्रतिजैविक, रेबीज लस संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:11 AM2018-04-01T00:11:04+5:302018-04-01T00:12:56+5:30

मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची प्रतिजैविके, अ‍ॅन्टीरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही), मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे. परिणामी, आर्थिक भुर्दंड सहन करून मेडिकल स्टोअरमधून औषधी घेण्याची वेळ हजारो रुग्णांवर येत आहे.

Antibiotics, rabies vaccine in Aurangabad valley | औरंगाबादच्या घाटीत प्रतिजैविक, रेबीज लस संपली

औरंगाबादच्या घाटीत प्रतिजैविक, रेबीज लस संपली

googlenewsNext
ठळक मुद्देगैरसोय : मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या औषधींचा ठणठणाट रुग्णाच्या जीवाशी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची प्रतिजैविके, अ‍ॅन्टीरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही), मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींचा ठणठणाट आहे. परिणामी, आर्थिक भुर्दंड सहन करून मेडिकल स्टोअरमधून औषधी घेण्याची वेळ हजारो रुग्णांवर येत आहे.
मोकाट कुत्रा चावल्यामुळे दररोज घाटीत किमान दहा ते पंधरा रुग्ण उपचारासाठी येतात. सोमवारी दिवसभरात ४० रुग्णांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. मात्र, अ‍ॅन्टीरेबीज व्हॅक्सिन (एआरव्ही) उपलब्ध नसल्याने रुग्णांवर मरणयातना सहन करण्याची वेळ येत आहे.
‘एआरव्ही’साठी घाटी प्रशासन महापालिकेकडे बोट दाखवून मोकळे होते. अशा परिस्थितीत रेबीस लसीसाठी रुग्णांना एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी भटकंती करावी लागते. उच्च रक्तदाब, मधुमेह, तापेच्या गोळ्यांसह अन्य औषधी, विविध प्रकारची प्रतिजैविके, इंजेक्शन यासह महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा असल्याचे समजते.
सलाईनही उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे. तापेच्या गोळ्या केवळ आठ दिवसच पुरतील इतक्याच आहेत. निधीअभावी औषधीपुरवठा सुरळीत होत नाही. निधीसाठी शासनाकडे डोळे लावून बसावे लागत आहे.
औषधीच्या तुटवड्यामुळे बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. एकट्या बाह्यरुग्ण विभागात दररोज १,५०० ते २ हजार रुग्ण उपचारासाठी येतात. औषधीअभावी घाटीबाहेरचा रस्ता धरण्याची वेळ अनेकांवर येत आहे.
औषधींचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा
काही औषधींचा तुटवडा असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. सलाईन, प्रतिजैविकांसह काही औषधी नाहीत. अ‍ॅन्टीरेबीज व्हॅक्सिनची महापालिके कडे मागणी करण्यात येते. औषधींसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक यांनी सांगितले.

Web Title: Antibiotics, rabies vaccine in Aurangabad valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.