फुलंब्री बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा चव्हाण बिनविरोध; जिल्ह्यात प्रथमच महिलेस संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2023 07:32 PM2023-05-22T19:32:55+5:302023-05-22T19:35:02+5:30

उपसभापतिपदी दत्तात्रय करपेंची बिनविरोध निवड 

Anuradha Chavan as Chairperson of Phulumbri Bazaar Committee; Opportunity for women for the first time in the district | फुलंब्री बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा चव्हाण बिनविरोध; जिल्ह्यात प्रथमच महिलेस संधी

फुलंब्री बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा चव्हाण बिनविरोध; जिल्ह्यात प्रथमच महिलेस संधी

googlenewsNext

फुलंब्री : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनुराधा अतुल चव्हाण तर उपसभापतीपदी दत्तात्रय करपे यांची बिनविरोध निवड झाली. आज दुपारी ४ वाजता  बाजार समिती सभागृहात निवडणूक पार पडली.

फुलंब्री बाजार समितीची ३० एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात आली यात भाजपा -शिवसेना शिंदे गटाला १८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या. तर एक जागा कॉंग्रेस पक्षाला, शिवसेना शिंदे गटाला दोन जागा तर एकजण अपक्ष निवडून आलेला आहे. अशा प्रकारे भाजप -शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात बाजार समिती आहे. 

आज सकाळी बाजार समिती सभागृहात सभापती -उपसभापती यांची निवड प्रक्रिया सुरु झाली. सभापती पदासाठी भाजपच्या अनुराधा चव्हाण ,तर शिवसेना  शिंदे गटाचे दत्तात्रय करपे यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. यावेळी कॉंग्रेस पक्षाचा निवडून आलेला एकमेव संचालक वरुण पाथ्रीकर हे निवड प्रक्रियेत गैरहजर होते. एकूण १८ संचालक पैकी १७ संचालक हजर होते. दोन पदासाठी दोनच अर्ज आल्याने निवडणूक  बिनविरोध झाली. 

आमदार हरिभाऊ बागडे यांनी नवनियुक्त सभापती -उपसभापती यांचे स्वागत केले. याप्रसंगी दामुअण्णा नवपुते ,माजी सभापती किर्शोर बलांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ, शिवाजीराव पाथ्रीकर, सविता फुके, जितेंद्र जैस्वाल, विवेक चव्हाण, बाळसाहेब तांदळे, सरला संतोष तांदळे, अप्पासाहेब काकडे, योगेश मिसाळ, गजानन नागरे, कृष्णा गावंडे, हौसाबाई काटकर, नरेंद्र देशमुख, सर्जेराव मेटे, ज्ञानेश्वर फलके, शिवाजी खरात ,जगन दाढे ,सूचित बोरसे,पंडितराव जाधव,योगेश जाधव,मयूर कोलते ,रवींद्र काथार ,बाबसाहेब सिनगारे आदि सह अनेकांची उपस्थिती होती. 

पहिल्या महिला सभापती 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता पर्यंत सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी महिलांची वर्णी लागलेली नव्हती. या क्षेत्रात आता अनुराधा चव्हाण यांच्या रूपाने  महिलांनी प्रवेश केला असून बाजार समितीची धुरा त्या सांभाळणार आहे पहिल्या महिला सभापती होण्याचा मान हि त्यांनी मिळविला आहे या क्षेत्रात त्या नवख्या असल्या तरी त्या बाजार समितीचा कारभार चालवून संस्थेला विकासाकडे घेऊन जातील अशी आपे अपेक्षा तालुक्यातील नागरिकांची आहे 

Web Title: Anuradha Chavan as Chairperson of Phulumbri Bazaar Committee; Opportunity for women for the first time in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.