औंढा पं.स.सभापतीपदी दराडे
By Admin | Published: March 20, 2016 01:07 AM2016-03-20T01:07:29+5:302016-03-20T01:11:53+5:30
औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड प्रक्रिया शनिवारी सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान पार पडली.
औंढा नागनाथ : येथील पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती पदाची निवड प्रक्रिया शनिवारी सकाळी ११ ते २ वाजेच्या दरम्यान पार पडली. यामध्ये अरूणाबाई दत्तराव दराडे यांची सभापतीपदी तर विनोद खंडागळे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
औंढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्याम मदनूरकर, बीडीओ विठ्ठल सुरोशे यांनी सकाळी ११ वाजता निवड प्रक्रियेस सुरूवात केली. शिवसेनेकडून सभापती पदासाठी अरूणाबाई दराडे तर उपसभापती पदासाठी विनोद खंडागळे यांनी नामनिर्देशन पत्र घेतले होते. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या वतीने अर्ज घेण्यात आले नाही. पीठासीन अधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दुपारी २ वाजता निवड प्रक्रिया चालू केली. यावेळी शिवसेना उमेदवारांच्या विरोधात दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे नामनिर्देशनपत्र दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नूतन सभापती- उपसभापतींचा सत्कार करण्यात आला. पं. स. सदस्य अंकुशराव आहेर, सुरजितसिंह ठाकूर, माऊली झटे, सुनील खंडागळे, शेषराव उघडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)