पीकपालट करण्याचे कृषीचे आवाहन
By Admin | Published: May 23, 2016 11:38 PM2016-05-23T23:38:07+5:302016-05-24T01:04:09+5:30
हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत
हिंगोली : बदलत्या वातावरणामुळे व पाऊसमान, पिकांवरील कीडरोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा शेतकऱ्यांनी पारंपरिक सोयाबीन व कापसाच्या पिकाला ब्रेक देत अन्य पिके घेण्याचा सल्ला कृषी विभागाच्या वतीने आगामी खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनात दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद तर सोयाबीन पिकावर मोझॅक तर खोडमाशीची आळी, चक्रभुंगा आदी रोगांचा प्रादुर्भाव पिकावर दिसत आहे. त्यामुळे या पिकापासून कमी उत्पन्न मिळत आहे. त्यातच अत्यल्प पर्जन्यमानामुळेही पिकांची वाढ खुंटत असून, उत्पादनात कमालीची घट होत आहे. नेहमीच पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या पिकांमुळे जमिनीचाही पोत बिघडून जातो. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी येत्या खरीप हंगामात पिकात बदल करणे गरजेचे आहे. विशेष करुन सोयाबीन व कापूस हे पीक वगळून इतर ज्वारी, बाजारी, तूर, तीळ आदी पिकांची पेरणी करावी. यंदाच्या खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यासाठी १० लाख ४७ हजार ९१ मेट्रिक टन गरज असून, महाबीजमार्फत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत ज्वारीसाठी १ हजार १५४ तर बाजरीसाठी ८.८५, मूग १ हजार २२, उडीद ७८२, तूर ४ हजार ५८, तीळ ९९ क्विंटल, सोयाबीन ९६ हजार १४७, इतर पिके ४८ क्विंटल लागणार असल्याचा अंदाज जिल्हा कृषी विभागाच्या वतीने आराखडा तयार केला असून, एवढ्या बियाणांची मागणीही केली आहे. सन २०१३- १४- १५ या वर्षाच्या तुलनेत सन २०१६- १७ मध्ये जास्त प्रमाणात बियाणे लागणार आहे.
(प्रतिनिधी)