उत्पन्नाची हमी असलेल्या बांबू लागवडीकडे वळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:05 AM2021-03-25T04:05:22+5:302021-03-25T04:05:22+5:30

पैठण तालुक्यातील टेकडी तांडा, शेकटा व तोंडीळी या गावांमध्ये बांबू लागवड आणि त्यावरील अनुदान या संदर्भात शेतकऱ्यांची आढावा ...

An appeal to turn to bamboo cultivation, which guarantees income | उत्पन्नाची हमी असलेल्या बांबू लागवडीकडे वळण्याचे आवाहन

उत्पन्नाची हमी असलेल्या बांबू लागवडीकडे वळण्याचे आवाहन

googlenewsNext

पैठण तालुक्यातील टेकडी तांडा, शेकटा व तोंडीळी या गावांमध्ये बांबू लागवड आणि त्यावरील अनुदान या संदर्भात शेतकऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष यज्ञवीर कवडे यांच्यासह प्रा. प्रशांत अवसरमल, लिपॉक सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जॉय डॅनियल यांची उपस्थिती होती.

बैठकीमध्ये यज्ञवीर कवडे म्हणाले की, शेतकऱ्यांनी मान्सूनच्या काळात जुन-जुलै महिन्यांत बांबूची लागवड करावी. बांबूला जास्त पाण्याची गरज भासत नसल्याने आणि बांबूचे जीवनचक्र ५० वर्षांपर्यंत असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही. बांबूचे उत्पादन लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून सुरू होते. शिवाय, दरवर्षी बांबूचे उत्पादन १० ते १५ टक्क्यांनी वाढते. म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी किमान १०० झाडे तरी लावावीत असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांनी केले आहे. यावेळी बांबू लागवड उत्पन्नवाढीसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादित मालाच्या विक्री व्यवस्थापनासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही लिपॉक सोशल फाउंडेशनचे संस्थापक जॉय डॅनियल यांनी दिली.

आढावा बैठकीसाखी सरपंच सुनील तांबे, संजय सांडू गरड, अरुण निवृत्ती गरड, अरुण कल्याण तांबे, रामचंद्र तांबे, गणेश वाघचौरे, कल्याण, शेळके, शांतीलाल राठोड, सुरेश राठोड, किशोर शेळके, विजय शेळके, आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: An appeal to turn to bamboo cultivation, which guarantees income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.