सुवर्ण नियमांचे पालन करण्याचे वाहनधारकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:09 AM2021-09-02T04:09:37+5:302021-09-02T04:09:37+5:30
अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस उपअधीक्षक ...
अप्पर पोलीस महासंचालक(वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टीपरसे व पोलीस निरीक्षक नंदिनी चानपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली २९ ऑगस्ट रोजी हतनूर पोलीस चौकीअंतर्गत महामार्गावर वाहनधारकांना थांबवत दहा सुवर्ण नियमांची माहिती दिली. यावेळी सय्यद जफर, गौतम थोरात, किशोर घुगे उपस्थित होते.
चौकट..
हे आहेत सुवर्ण नियम
विना हेल्मेट वाहन चालवू नका, दुचाकी वाहनावर ट्रिपलसीट जाऊ नका, महामार्गावर वाहने पार्क करू नका, दारू पिऊन वाहन चालवू नका, वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नका, महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहने चालवू नका, महामार्गावर अनावश्यक कट तयार करू नका, गावातून महामार्गावर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची गती कमी ठेवा, महामार्गावर भरधाव वेगात वाहने चालवू नका, वाहन चालवताना सीटबेल्टचा वापर करा.
310821\4754img_20210828_162553.jpg
सुवर्ण नियमांची माहिती देताना सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना राठोड