सातारा परिसराला आले बेटाचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:04 AM2021-07-24T04:04:36+5:302021-07-24T04:04:36+5:30
औरंगाबाद : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी, भीमवाडी, लक्ष्मी काॅलनी, औरा व्हिलेजलगतचा परिसर पावसाळा आला, ही बेटाच्या सान्निध्यात राहिल्याचा भास ...
औरंगाबाद : सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी, भीमवाडी, लक्ष्मी काॅलनी, औरा व्हिलेजलगतचा परिसर पावसाळा आला, ही बेटाच्या सान्निध्यात राहिल्याचा भास येथील नागरिकांना होत आहे. मनपा किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील समस्यांकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सातारा परिसरातील अनेक कुटुंब घर रिकामे करून, दुसरीकडे भाड्याच्या खोलीत राहावयास गेले, तर अनेक जण जीव धोक्यात घालून कुटुंबासह राहत आहेत. दिवसभर कामाला जायचे आणि घरी कुटुंबात यायचे पाऊस आला, तर घरात पाणी शिरते की काय, अशा भीतीने डोळ्याला डोळाही लागत नाही. मनपाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी कैफियत मांडली, परंतु त्यावर काहीही तोडगा निघाला नाही.
यांच्या घरात व अंगणात पाणी...
सुमंतराव साळवे, गजानन कुलकर्णी, माणिक गायकवाड, सतीश कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, सुलभा देशपांडे यांच्या घरात व अंगणात पाणी शिरले असून, मोठा पाऊस आला, तर कुटुंबाच्या जीवनमरणाचा प्रश्न उद्भवला आहे.
आयुक्तांनी दौरा मारून केली पाहणी...तोडगा नाही
सातारा : देवळाई परिसरातील विविध वसाहतींचा दौरा आयुक्तांनी अधिकाऱ्यांसह केला, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, परंतु त्यावर ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही. अजून किती दिवस नागरिकांना पाण्यात राहायचे, असा सवाल आहे.
- राहुल शिंदे, रहिवासी.(प्रतिक्रिया)
औराव्हिलेज परिसरालगत सांडपाण्याचा, तसेच पावसाच्या पाण्याचे तळे साचते, त्याच्या सफाईसाठीही कुणीच पुढे येताना दिसत नाही. अधिकाऱ्यांना नागरिकांनी समस्या सांगून त्याचा काहीही उपयोग होत नाही. सांडपाण्याचा योग्य निचरा केल्यास, परिसर स्वच्छ व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिल.
- सोहेल सय्यद, रहिवासी. (प्रतिक्रिया)
पथक त्या परिसराची पाहणी करणार...
सातारा : देवळाईच्या अनेक वसाहतीत सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या उद्भवते. शक्यतो, पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होते. पथक घटनास्थळाची पाहणी करणार असून, पाणी तुंबण्याचे काय कारण आहे, त्यावर तोडगा काढण्यासाठी वरिष्ठाकडे तो अहवाल पाठविणार आहे.
- डॉ.संतोष टेंगळे, उपायुक्त मनपा
कॅप्शन
सातारा परिसरात पावसाचे पाणी तुंबले की, या पाण्यातून घरात जाताना साप व बेडूक दिसतात. जीव मुठीत धरून नागरिकांना राहावे लागत आहे. हे सातारा भागातील हायकोर्ट कॉलनीलगतचे चित्र.