जिल्ह्यातील १७०७ शेततळ्यांसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज

By Admin | Published: March 11, 2016 12:55 AM2016-03-11T00:55:02+5:302016-03-11T01:04:04+5:30

जालना : शासन मागेल त्याला शेततळे ही योजना राबवित आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १७०७ शेततळी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Applications for 4.5 thousand farmers for the 1707 farmers of the district | जिल्ह्यातील १७०७ शेततळ्यांसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज

जिल्ह्यातील १७०७ शेततळ्यांसाठी साडेपाच हजार शेतकऱ्यांचे अर्ज

googlenewsNext


जालना : शासन मागेल त्याला शेततळे ही योजना राबवित आहे. या अंतर्गत जिल्ह्यात १७०७ शेततळी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. यासाठी १० मार्चपर्यंत तब्बल ५५५५ अर्ज महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. एकूणच अत्यल्प शेततळ्यांसाठी अर्जांचा पाऊस पडत आहे.
कृषी विभागाच्या वतीने २०१६ साठीचा लक्षांशातील आठ तालुके मिळून केवळ १७०७ शेततळी मंजूर आहेत. तालुक्याच्या वाट्याला साधारणपणे २०० शेततळी येण्याचा अंदाज आहे. २३ फेब्रुवारी आॅन लाईन नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. तेव्हापासून १० मार्चपर्यंत एकूण ५ हजार ५५५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.पैकी ४ हजार ८२७ जणांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली असून ३ हजार ८३५ शेतकऱ्यांना पेमेंटही भरले आहे. राज्यात अर्ज भरण्यात जिल्हा चौथ्या स्थानावर आहे.
काही वर्षांत घटत्या पर्जन्यमानामुळे शेती संकटात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेततळ्यावर जोर दिला आहे. शासनाने मागेल त्याला शेततळे जाहीर केले असले तरी फक्त सतराशे शेततळी मिळणार आहेत. शेतकऱ्यांना शेततळ्याची प्रतीक्षा असताना किरकोळ स्वरूपात शेततळे मिळणार आहेत.
कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे म्हणाले, शेतकरी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून शेततळ्यांसाठी अर्ज भरले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील प्राप्त अर्जानुसार ५५५५ अर्ज प्राप्त झाले आहेत. लाभार्थींना जास्तीत ५० हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. शेततळ्याचा आकार ३० बाय ३० मीटर आकाराचा असेल. आॅनलाईन अर्ज प्रक्रियेमुळे पारदर्शकता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Applications for 4.5 thousand farmers for the 1707 farmers of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.