जुनी पेन्शन लागू करण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:02 AM2021-09-27T04:02:07+5:302021-09-27T04:02:07+5:30

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नियुक्ती तारखेचा निकष असावा -- विक्रम काळे : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा --- ...

To apply the old pension | जुनी पेन्शन लागू करण्यासाठी

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी

googlenewsNext

जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नियुक्ती तारखेचा निकष असावा

--

विक्रम काळे : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा

---

औरंगाबाद : शिक्षण विभागातील शिक्षकांची कामे तत्काळ व्हावी. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी संवेदनशील असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी नियुक्ती दिनांक हाच निकष असावा. यासाठी शासनकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आ. विक्रम काळे यांनी सांगितले.

विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, १०० टक्के अनुदानित २००५ पुर्वीचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा शनिवारी यशवंत कला महाविद्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे, सुनील भोर, सुरेश पठाडे, प्राचार्य रवींद्र तोरवणे, अनिल घायवट, विजय फरकाडे, प्रशांत मेरत, गणेश पवार, उद्धव घनवट, रवींद्र तम्मेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. काळे म्हणाले, शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने विद्यार्थी उत्साहित झाले आहेत. आता शिक्षकांनीही तयारीला लागायला हवे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. सूत्रसंचलन गणेश पवार यांनी केले, तर आभार विखे यांनी मानले.

Web Title: To apply the old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.