अधिकाऱ्यांच्या हाती गावगाडा; कन्नड, वैजापुर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 10:34 AM2020-08-29T10:34:18+5:302020-08-29T10:38:53+5:30

तालुक्यातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांना ३१ आॅगस्टपासून मुळ पदाचे कामकाज संभाळून प्रशासक पदाची जबाबदारी संभाळवी लागणार आहे.

Appointment of Administrators on 47 Gram Panchayats in Kannad, Vaijapur taluka | अधिकाऱ्यांच्या हाती गावगाडा; कन्नड, वैजापुर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

अधिकाऱ्यांच्या हाती गावगाडा; कन्नड, वैजापुर तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या टप्प्यात १० सप्टेंबरला १२५ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्याआधी तिथेही प्रशासक नियुक्ती केली जाईल.

- योगेश पायघन 
औरंगाबाद ः कन्नड व वैजापुर तालुक्यातील ३० आॅगस्टला मुदत संपणार्या ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगशे गोंदावले यांनी केली आहे. कन्नड तालुक्यातील २३ तर २४ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. तालुक्यातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, कृषी अधिकारी, पशुधन पर्यवेक्षकांना ३१ आॅगस्टपासून मुळ पदाचे कामकाज संभाळून प्रशासक पदाची जबाबदारी संभाळवी लागणार आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सल्ल्याने न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून या ४७ ग्रामपंचायतींवर प्रशासकाच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. ग्रामपंचायत प्रशासकांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधिल तरतुदीनुसार व वेळोवेळी दिले जाणारे शासन आदेशानुसार कामकाज करावे. प्रशासकांना ग्रा. पंचायत कामकाजात मतदानाचा अधिकार असणार नाही. तसेच मुळ पदाचे काम संभाळून हे पुढील आदेशापर्यंत कामकाज संभाळावे असे आदेशात म्हटले आहे. हा पहिला टप्पा होता. दुसर्या टप्प्यात १० सप्टेंबरला १२५ ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्याआधी तिथेही प्रशासक नियुक्ती केली जाईल. अशी माहीती पंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे यांनी लोकमतला सांगितले. 
--
सोमवार पासून आदेशाची अंमलबजावणी
कन्नड व वैजापुर तालुक्यातील मुदत संपलेल्या ४७ ग्रामपंचायतींवर शुक्रवारी प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहेत. ३१ आॅगस्टपासून नियुक्त्यांची अंमलबजावणी लागू होईल.
-डाॅ. मंगेश गोंदावले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. औरंगाबाद

 

कन्नड तालुक्यातील नियुक्त्या 

ग्रामपंचायत ः नियुक्त प्रशासक 

आलापुर ः  डी. एन. मगर, विस्तार अधिकारी 

बिबखेडा ः मिलींद सरवदे, विस्तार अधिकारी 

देभेगांव ः एस. बी. जाधव, विस्तार अधिकारी 

घुसुर ः डि. वाय. अंभोरे, विस्तार अधिकारी

हसनखेडा ः श्रीमती. के. एस. पदकोंडे, विस्तार अधिकारी

जवळी खु ः पी. एस. शेलार, मुख्याध्यापक 

कळंकी ः बी. एम. महाले, मुख्याध्यापक 

लामणगांव ः टी. एम. राठोड, मुख्याध्यापक

लंगडतांडा ः के. बी. पगारे, मुख्याध्यापक 

मुंडवाडी ः आर. एस. पाटील, मुख्याध्यापक 

मुंडवाडी तांडा ः जे. पी. काथार, मुख्याध्यापक 

नादरपुर ः ए. एस. गाडेकर, मुख्याध्यापक

पिंपरखेड ः एन. व्ही. निलावाड विस्तार अधिकारी 

रेल ः एस. डी. चव्हाण, विस्तार अधिकारी 

रोहीला खु ः एस. के. म्हस्के, मुख्याध्यापक 

रामपुरवाडी ः ए. व्ही. भाले, मुख्याध्यापक 

सोनवाडी ः एस. बी. कोळी, मुख्याध्यापक 

सायगव्हाण ः एस. बी. महाजन, मुख्याध्यापक 

सावरगांव ः एन. टी. डोंगरे, विस्तार अधिकार ी

सासेगांव ः एन. एन. भोपळे, मुख्याध्यापक 

तळनेर ः एम. वाय. केवटे, मुख्याध्यापक 

उपळा ः आर. यु. भोसले, मुख्याध्यापक 

वाकी ः एस. के. कुचकुरे, विस्तार अधिकारी

 

वैजापुर तालुक्यातील नियुक्त्या 

ग्रामपंचायत ः नियुक्त प्रशासक 

मस्की/सिद्धपुर ः एस. एस. जाधव, विस्तार अधिकारी 

हाजीपुरवाडी ः डी. एन. कांबळे, विस्तार अधिकारी 

डोणगाव ः मनीष देवकर, विस्तार अधिकारी 

बाजाठाण ः एस. एन. मुसने, विस्तार अधिकारी 

कापुसवडगांव ः व्हि. पी. पंडीत, विस्तार अधिकारी 

पिंपळगांव खंडाळा ः के. ए. सामंत, मुख्याध्यापक 

जरुळ ः एस. आर. म्हस्के, विस्तार अधिकारी 

चेंडुफळ ः आर. ए. जाधव, मुख्याध्यापक 

सावखेड गंगा ः बी. एम. सुलताने, मुख्याध्यापक 

भगुर ः श्रीमती पी. एस. बोर्डे, मुख्याध्यापक 

झोलेगाव ः डाॅ. ए. डी. पैठणकर, पशुधन पर्यवेक्षक 

सटाणा ः व्हि. यु. पठारे,  मुख्याध्यापक 

नायगव्हाण /वळण ः प्रमोद देशपांडे, पशुधन पर्यवेक्षक 

टेंभी / कोंटगाव ः बी. के. म्हस्के, मुख्याध्यापक 

माळीसागज ः अे. बी. करंकाळ, मु्ख्याध्यापक 

चिकटगाव ः एच. आर. बोयनार, कृषी अधिकारी 

तलवाडा ः जी. एस. चुकेवाड विस्तार अधिकारी 

लोणी, खुर्द ः जी. डी. देशमुख, विस्तार अधिकारी 

आघूर ः आर. बी. धुळे विस्तार अधिकारी 

भायगांव वैजापुर ः बी. एन. घुगे, विस्तार अधिकारी 

बाभुळतेल ः एन. एम. व्हसाळे, मुख्याध्यापक 

भिवगांव ः ए. आर. त्रिभुवन, मुख्याध्यापक 

बाभुळगांव बु ः आर. एम. तुपे, मुख्याध्यापक 

भटाणा ः आर. आर. आढाव, मुख्याध्यापक

Web Title: Appointment of Administrators on 47 Gram Panchayats in Kannad, Vaijapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.