ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

By बापू सोळुंके | Published: October 21, 2022 12:00 PM2022-10-21T12:00:54+5:302022-10-21T12:01:39+5:30

शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्षाला माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची आठवण आली.

Appointment of Kishan Chand Tanwani as Aurangabad District Chief of Shiv Sena Uddhav Thakarey Group | ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

ठाकरेंनी हट्ट पुरवला! शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्हाप्रमुख पदी किशनचंद तनवाणींची नियुक्ती

googlenewsNext

औरंगाबाद : शिवसेनेच्या औरंगाबाद मध्य, पश्चिम आणि पूर्व  विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुखपदी किशन तनवाणी यांची नियुक्ती करण्यात आली. अखेर तनवाणींचा हट्ट मातोश्रीने पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून जिल्हाप्रमुखपद मिळाल्याने आता तरी तनवाणी सक्रीय होतील का ? असेही बोलले जात आहे.

अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार किशनचंद तनवाणी यांना पक्षाने कोणताही पक्षाने कोणतेही पद दिले नव्हते. शिवसेनेत आल्यानंतर जिल्हाप्रमुख पद देऊ असा शब्द त्यांना देण्यात आला होता. मात्र, पक्षाने त्यांना त्यांची कदर केली नव्हती. दरम्यान, शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेले. शिवसेनेला पडलेल्या मोठ्या खिंडारानंतर पक्षाला त्यांची आठवण आली. अडीच महिन्यापूर्वी त्यांना शिवसेनेच्या औरंगाबाद महानगरप्रमुख स्वतंत्र कारभार असलेले पद देण्यात आले होते. 

परंतु, या पदावर ते समाधानी नव्हते याविषयी त्यांनी नाराजी ही व्यक्त केल्याची चर्चा होती . परिणामी स्वतंत्र भार असूनही ते शिवसेनेत फारसे सक्रिय झाले नव्हते. त्यांनी जिल्हाप्रमुख पद पाहिजे यासाठी मातोश्री कडे हट्ट लावून धरला होता. अखेर मातोश्रींनी त्यांचा हट्ट पुरविला. गुरुवारी त्यांची औरंगाबाद मध्य, पूर्व, आणि पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे आता तीन जिल्हाप्रमुख झाले आहेत. अंबादास दानवे, राजू राठोड आणि किशनचंद तनवाणी असे तिघे जिल्ह्यात काम करतील. 

Web Title: Appointment of Kishan Chand Tanwani as Aurangabad District Chief of Shiv Sena Uddhav Thakarey Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.