मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती
By विकास राऊत | Updated: July 17, 2023 12:41 IST2023-07-17T12:39:49+5:302023-07-17T12:41:21+5:30
मधुकर आर्दड हे मुळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती
छत्रपती संभाजीनगर: वाल्मी येथील जलसंधारण विभागाचे आयुक्त मधुकर आर्दड यांची विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील केंद्रेकर यांनी व्हीआरएस घेतल्याने ३ जुलैपासून हे पद रिक्त होते. दरम्यान, खंडपीठाने २८ जुलै पर्यंत पद भरण्यासाठी सरकारला आदेशित केले होते.
मधुकर आर्दड हे मुळचे जालना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सीईओ, सिडको मुख्य प्रशासक, जलसंधारण आयुक्त अशा पदांवर कार्य केले आहे. आता त्यांची नियुक्ती विभागीय आयुक्तपदी करण्यात आली आहे.