अर्ज येण्यापूर्वीच नियुक्ती आदेश
By Admin | Published: January 29, 2017 11:56 PM2017-01-29T23:56:23+5:302017-01-29T23:58:40+5:30
केज : कार्यानुभव विषय शिकवण्यासाठी अर्ज येण्यापूर्वीच नियुक्ती आदेश निघाल्याची धक्कादायक बाब जवळबन येथे समोर आली.
केज : कार्यानुभव विषय शिकवण्यासाठी शालेय समित्यांना अतिथी निदेशक पद भरण्याचे अधिकार दिले आहेत. यामध्ये सावळा गोंधळ असून, अर्ज येण्यापूर्वीच नियुक्ती आदेश निघाल्याची धक्कादायक बाब जवळबन येथे समोर आली.
मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांनी १४ जून २०१६ रोजी ठराव घेऊन अतिथी निदेशक पदावर लक्ष्मीकांत काळे यांची निवड केली. प्रत्यक्षात त्यांनी शालेय समितीकडे २१ जून २०१६ रोजी अर्ज केलेला होता. विशेष म्हणजे स्थानिक उमेदवाराला डावलून ही नियुक्ती दिली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक व शालेय समिती अध्यक्ष चौकशीच्या घेऱ्यात सापडले आहेत. दत्तात्रय भाकरे या उमेदवाराने या नियुक्तीला आक्षेप घेतला असून, बेकायदेशीर नियुक्ती देणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत मुख्याध्यापक रामेश्वर उमाप म्हणाले, बीईओ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे. (वार्ताहर)