कुलसचिवांची नियुक्ती बेकायदाच..
By Admin | Published: September 21, 2016 12:11 AM2016-09-21T00:11:18+5:302016-09-21T00:21:14+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांची नियुक्तीच बेकायदा असून, शासनाने आणि विद्यापीठाने त्यांचे वेतन अदा करूनये,
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांची नियुक्तीच बेकायदा असून, शासनाने आणि विद्यापीठाने त्यांचे वेतन अदा करूनये, अशा प्रतिक्रिया विद्यापीठ वर्तुळात उमटल्या आहेत. कुलसचिवपदाच्या मुलाखतीत अपात्र ठरलेला माणूस पुन्हा त्याच पदावर येण्यासाठी पात्र कसा ठरला असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.
कुलगुरूडॉ. बी. ए. चोपडे यांनी आपल्या अधिकारात डॉ. जब्दे यांची नियुक्ती केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कुलगुरूंना अशी बेकायदा नियुक्ती करण्याचा अधिकार नसल्यानेच उच्च शिक्षण सहसंचालकांनी डॉ. जब्दे यांने वेतन रोखल्याचेही विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम केलेल्या प्राध्यापकांनी सांगितले. विद्यापीठात कायदेशीर पद्धतीने काम चालतच नसल्याची उद्विग्न करणारी प्रतिक्रियाही काहींनी व्यक्त केली.
दरम्यान, डॉ. जब्दे यांचे वेतन रोखल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर डॉ. जब्दे यांनी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कुलगुरू डॉ. चोपडे यांची भेट घेऊन चर्चा केली.
कुलगुरूंनी कुलसचिव म्हणून डॉ. प्रदीप जब्दे यांची केलेली नियुक्ती ही बेकायदाच आहे. एखाद्याने चुकीचा निर्णय घेतला असेल तर त्याची भरपाई निर्णय घेणाऱ्या व्यक्तीकडून केली पाहिजे, असा पूर्वी नियम होता. त्या न्यायाने डॉ. जब्दे यांच्या चुकीच्या नियुक्तीला कुलगुरूजबाबदार आहेत. त्यांच्याकडून भरपाई मागावी लागेल. विद्यापीठात सध्या बेकायदा काम करण्याची स्पर्धाच लागली आहे. कुलसचिव नियुक्ती हा त्या बेकायदा कामाचाच एक भाग आहे.
- अण्णासाहेब खंदारे,
माजी सिनेट सदस्य