औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वेमार्गाला मंजुरी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:25 AM2019-02-26T00:25:05+5:302019-02-26T00:25:22+5:30
औरंगाबाद- दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव या ८८ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी सोमवारी मराठवाडा रेल्वे विकास समितीने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद- दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव या ८८ कि.मी.च्या रेल्वेमार्गाला आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी द्यावी, अशी आग्रही मागणी सोमवारी मराठवाडा रेल्वे विकास समितीने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.
अलीकडेच समितीच्या आग्रही मागणीनंतर रेल्वे विभागाने नांदेड-देगलूर-बीदर या १५५ कि.मी. नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्टÑ कर्नाटकाला बराच फायदा होणार आहे. या कामासाठी २१५५ कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली. उस्मानाबाद-बीड रेल्वे मार्गाला मंजुरी दिल्याबद्दल मराठवाडा ऋणी असल्याचे समितीने नमूद केले आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी औरंगाबाद- चाळीसगाव, जालना-खामगाव, रोटेगाव-कोपरगाव या रेल्वे मार्गांनाही मंजुरी द्यावी, अशी मागणी केली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून यापूर्वी अनेकदा सातत्याने मराठवाड्यावर अन्याय झाला आहे. औरंगाबादेत रेल्वेच्या बऱ्याच जमिनी पडून आहेत. तेथे रेल्वेकडून स्तुत्य प्रकल्प सुरू करावा, जेणेकरून मराठवाड्यातील तरुणांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षाही ओमप्रकाश वर्मा यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.