आमदार हर्षवर्धन जाधव यांचा परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:24 PM2019-04-30T23:24:11+5:302019-04-30T23:26:44+5:30

परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेला फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी मंजूर केला.

Approval of permission for Harshavardhan Jadhav's permission to go abroad | आमदार हर्षवर्धन जाधव यांचा परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज मंजूर

आमदार हर्षवर्धन जाधव यांचा परदेशात जाण्यासाठी परवानगी मागणारा अर्ज मंजूर

googlenewsNext

औरंगाबाद : परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दाखल केलेला फौजदारी अर्ज औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी मंजूर केला.
पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात सत्र न्यायालयाने त्यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला होता.
महाराष्टÑाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ५ जानेवारी २०११ रोजी वेरूळ लेणीला भेट देण्यासाठी आणि वेरूळच्या पर्यटन केंद्रामध्ये असलेल्या शासकीय बैठकीसाठी औरंगाबादला आले होते. त्यावेळी त्यांना भेटण्याच्या आग्रहावरून पोलीस व आ. जाधव यांच्यात झटापट झाली होती. जाधव यांनी पोलिसांना मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी तपास पूर्ण करून १० मार्च २०११ रोजी न्यायालात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीअंती न्यायालयाने आमदार जाधव यांना दोषी धरले. सरकारी कामात अडथळा आणणे व शासकीय कर्मचाऱ्यांना जखमी केल्याच्या कलमांतर्गत सत्र न्यायालयाने त्यांना वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला होता. औरंगाबाद खंडपीठाने आ. जाधव यांना ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.
दरम्यान विदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी आ. जाधव यांनी अ‍ॅड. अभयसिंह भोसले यांच्यामार्फत खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल केला होता. सुनावणीअंती न्यायालयाने सदर विनंती मंजूर केली. सरकारतर्फे अ‍ॅड. कार्तिक मुंडे व केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. डी.जी. नागोडे यांनी काम पाहिले

Web Title: Approval of permission for Harshavardhan Jadhav's permission to go abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.