पीक विमा मंजूर करा, शिवसेना तालुका संघटकांची मागणी
By | Published: December 2, 2020 04:09 AM2020-12-02T04:09:48+5:302020-12-02T04:09:48+5:30
मागणी शिवसेना तालुका संघटक डाॅ. अण्णासाहेब शिंदे यांनी देवगाव रंगारी येथे शुक्रवारी केली. देवगाव रंगारी महसूल मंडळातील मौजे चांभारवाडी ...
मागणी शिवसेना तालुका संघटक डाॅ. अण्णासाहेब शिंदे यांनी देवगाव रंगारी येथे शुक्रवारी केली. देवगाव रंगारी महसूल मंडळातील मौजे चांभारवाडी व देवळाणा येथे आयोजित पीक कापणी प्रयोग कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
परिसरातील अंसख्य शेतकऱ्यांनी शेती पिकाचे विमा काढलेले आहेत. निदान आणेवारीचा प्रश्न शेतकऱ्यांच्या बाजूने निकाली लावण्यासाठी शिवसेना तालुका संघटक डाॅ. अण्णासाहेब शिंदे यांनी प्रशासनाकडे मागणी लावून धरली. त्यावर प्रशासनाने प्रतिसाद देत पीक कापणी प्रयोग राबविला. त्यात शुक्रवारी देवगाव रंगारी महसूल मंडळातील मौजे चांभारवाडी येथील शेतकरी शामराव हिवाळे व देवळाणा येथील शेतकरी अंबादास उबाळे, योगेश सुरासे या शेतकऱ्यांच्या शेतात तिसरा पीक कापणी प्रयोग घेण्यात आला. याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला. त्याप्रसंगी तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना निदान तीस ते पस्तीस टक्के आणेवारीत पिके बसवून त्यांना तात्काळ अर्थसाह्य करावे, अशी मागणी तालुका संघटक डाॅ. अण्णासाहेब शिंदे यांनी केली. त्यावेळी उपतालुकाप्रमुख संजय मोटे, पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, मंडळ अधिकारी आबा पाटील, तलाठी सुरावसे अप्पा, कौस्तुभ भिंगारे, भास्कर मोटे, योगेश पांडव, गणेश सवई, कचरू सवई, कोतवाल, अकिल शेख आदी उपस्थित होते.
अतिपावसाने पिकांचे नुकसान
यंदा अति पावसाने कन्नड तालुक्यातील परिसरातील पिकाचे नुकसान झाले. त्यात कापूस, टोमॅटो, अद्रक, मका आदी पिके हातातून गेल्याने उत्पन्नात घट झाली. दरम्यान अतिवृष्टीच्या निकषात पाठवलेल्या अवाहलातून देवगाव रंगारी व औराळा महसूल विभाग वगळल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला शेतकऱ्यां सामोरे जावे लागले.