प्रकल्प उभारताना घेतला जातो वास्तुशास्त्राचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:05 AM2021-06-05T04:05:31+5:302021-06-05T04:05:31+5:30
औरंगाबाद : आपला फ्लॅट किंवा शॉप वास्तुशास्त्रनुसार बांधलेला असावा, अशी ७० ते ७५ टक्के ग्राहकांची मागणी असते. याचा ...
औरंगाबाद : आपला फ्लॅट किंवा शॉप वास्तुशास्त्रनुसार बांधलेला असावा, अशी ७० ते ७५ टक्के ग्राहकांची मागणी असते. याचा विचार करूनच बांधकाम व्यावसायिक अपार्टमेंट किंवा कमर्शिअल कॉम्प्लेक्स उभारत आहेत.
वास्तुशास्त्र म्हणजे बांधकामाचे सायन्स आहे, असे म्हणत, खिवसरा ग्रुपचे संस्थापक संचालक रवींद्र खिवसरा यांनी सांगितले की, गृहप्रकल्प उभारताना ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्याकडे कल असतो. ७० ते ७५ टक्के ग्राहकांना वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेले फ्लॅट पाहिजे असतो. त्यानुसार, आर्किटेक्टकडून वास्तुशास्त्रानुसार गृहप्रकल्पाचे डिझाइन तयार करून घेतले जाते. हॉल, किचन, मास्टर बेडरूम, चाइल्ड रूम, बाथरूम यांची दिशा वास्तुशास्त्रानुसार ठरविली जाते. एवढेच नव्हे, तर कमर्शियल कॉप्लेक्समध्येही याच वास्तुशास्त्रानुसार बांधकाम केले जाते. वास्तूमध्ये जास्तीतजास्त सूर्यप्रकाश यावा, घरात हवा खेळती असावी, कुठेही कोंदट वातावरण नसावे, मुख्य दरवाजा असो व प्रकल्पातील मुख्य प्रवेशद्वार हे वास्तुशास्त्रानुसारच योग्य दिशेलाच उभारले जाते. असे गृहप्रकल्प असो व कमर्शियल कॉम्प्लेक्स त्याची बुकिंग लवकर होते, असा अनुभव आहे, असे खिवसरा यांनी सांगितले. फ्लॅट पसंत करताना, काही ग्राहक वास्तुशास्त्रज्ञांना घेऊन येतात व त्यांच्या सल्ल्यानुसार फ्लॅट बुक करतात, असेही नमूद केले.