लाठीमाराच्या निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन
By Admin | Published: December 20, 2015 11:26 PM2015-12-20T23:26:49+5:302015-12-20T23:52:51+5:30
बीड : नागपूर अधिवेशनावर मातंग समाजाने काढलेल्या मोर्चेकऱ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ बीडमध्ये मातंग समाजाच्या वतीने अण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोर
बीड : नागपूर अधिवेशनावर मातंग समाजाने काढलेल्या मोर्चेकऱ्यांवर केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ बीडमध्ये मातंग समाजाच्या वतीने अण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोर रविवारी सकाळी अर्धनग्न होऊन तरूणांनी आंदोलन केले. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासासाठी ठप्प झाली होती.
नागपूरमध्ये अधिवेशन सुरू असून विविध मागण्यांसाठी सामाजिक संघटना, पक्ष मोर्चे घेऊन जात आहेत. मोर्चेकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. आंदोलकरांचे गाऱ्हाणे ऐकून घेण्याऐवजी सरकार दंडुकेशाहीने लोकांच्या मागण्या दडपत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
नागपूर येथे मातंग समाजाने काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. याच्या निषेधार्थ बीड शहरातील अण्णा भाऊ साठे पुतळ्यासमोर मातंग समाजाच्या तरूणांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केले.
घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामुळे वाहतूक जवळपास अर्ध्या तासासाठी ठप्प झाली होती. यावेळी माजी नगरसेवक मच्छिंद्र जोगदंड, सुभाष लोणके, धुताडमल यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)