शेतातील पार्टीत नॉनव्हेज कमी वाढल्याने वाद, तरुणाने मित्राचा हातपाय तोडून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 12:14 PM2023-05-31T12:14:44+5:302023-05-31T12:15:18+5:30

खून केल्यानंतर तरुण मृतदेहा शेजारील शेतात निवांत झोपून राहिला

Argument over non-veg dish distribution in farm party, youth kills friend by cutting his arms and legs | शेतातील पार्टीत नॉनव्हेज कमी वाढल्याने वाद, तरुणाने मित्राचा हातपाय तोडून केला खून

शेतातील पार्टीत नॉनव्हेज कमी वाढल्याने वाद, तरुणाने मित्राचा हातपाय तोडून केला खून

googlenewsNext

सिल्लोड : मध्यप्रदेश येथून धारला(ता. सिल्लोड) येथे मोलमजुरी करणाऱ्या दोन परप्रांतीय कामगार मित्रांनी सोमवारी(दि.२९) रात्री शेतात नॉनव्हेज जेवणाची पार्टी केली. मात्र, वाढण्यात कमी जास्त घेतल्याच्या कारणावरुन दोघांत वाद झाला. यामध्ये एका मित्राने दुसऱ्या मित्राचा लोखंडी टॉमीने हातपाय तोडून खून केला. जितेंद्र काशीराम धुरवे(वय ३४, रा. हनुमंता टापू, ता. मुंडी, जि. खंडवा, मध्यप्रदेश) असे मयताचे नाव आहे तर ओमजय जगदीश सुरेश रघुवंशी/ठाकूर(वय ३५, रा. छोटी पोलिस लाइनजवळ, हरदा, मध्यप्रदेश) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

मध्यप्रदेशातील जितेंद्र धुर्वे व ओमजय जगदीश रघुवंशी हे दोघे मित्र असून, ते धारला येथील शेतकरी त्र्यंबक झाबू सोनवणे यांच्याकडे १७ मे रोजी मोलमजुरीसाठी आले होते. शेतात लावलेल्या मिरचीची राखण करणे व इतर कामे करण्यासाठी त्यांना शेतात सालदार म्हणून ठेवण्यात आले होते. या दोघांनी सोमवारी रात्री नॉनव्हेज पार्टी केली. मात्र, डिश वाढण्यात कमी जास्त झाल्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हा वाद सुरु असताना शेतकरी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे यांनी समजूत घालून तो सोडविला. त्यानंतर दोघेही शेतकरी घरी गेले.

दरम्यान, रात्री ११ वाजेदरम्यान पुन्हा या दोघांमध्ये वाद झाला.  यावेळी आरोपी ओमजयने जितेंद्रचे हातपाय तोडून त्याचा खून केला व शेजारी शेतात झोपून राहिला. सकाळी दूध काढण्यासाठी परसराम सोनवणे व त्र्यंबक सोनवणे शेतात आले असता, त्यांना जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्यांनी झोपलेल्या आरोपी ओमजयला विचारले असता, त्याने मीच त्याचा खून केल्याचे सांगितले. सोनवणे यांनी या घटनेची सिल्लोड पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोनि. सीताराम मेहेत्रे, फौजदार विकास आढे, सचिन सोनार, पोना. अनंत जोशी, ज्ञानदेव ढाकणे, यतीन कुलकर्णी, मंगेश राठोड यांनी धाव घेत पंचनामा केला. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले तसेच आरोपी ओमजयला अटक करण्यात आली. पोलिसांनी मयत व आरोपींच्या कुटुंबीयांना माहिती दिली. रात्री उशिरा त्यांचे नातेवाईक सिल्लोड येथे हजर झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Argument over non-veg dish distribution in farm party, youth kills friend by cutting his arms and legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.