सशस्त्र चोरट्यांचा परंड्यात धुमाकूळ

By Admin | Published: January 1, 2015 12:20 AM2015-01-01T00:20:58+5:302015-01-01T00:25:41+5:30

उस्मानाबाद : धारधार शस्त्रास्त्राचा धाक दाखवून शहरातील पाच घरे फोडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील

Armed robbers stranded | सशस्त्र चोरट्यांचा परंड्यात धुमाकूळ

सशस्त्र चोरट्यांचा परंड्यात धुमाकूळ

googlenewsNext


उस्मानाबाद : धारधार शस्त्रास्त्राचा धाक दाखवून शहरातील पाच घरे फोडल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील संगम पार्क व कासीमबाग परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी हा धुमाकूळ घातला.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहराच्या बाहेरील बाजूस संगम पार्क ही वसाहत आहे. तर करमाळा रोडवर कासीम बाग असून, या दोन्ही ठिकाणी चोरट्यांनी हा धुडघूस घातला. संगम पार्क कॉलनीतील परवेज सैफन शेख यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरात उपस्थित असलेल्यांना शस्त्रास्त्राचा धाक दाखवित ४ हजार रुपये रोख व २२ हजाराचे सोन्याचे दागदागीने लुटले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा शेजारीच राहत असलेल्या फकीर दादा बनसोडे यांच्या घराकडे वळविला. त्यांच्याकडील २ हजार ४०० रुपये व सोन्याचे दागीने धमकावून घेतल्यानंतर मैनू लतीफ शेख यांचा दहा हजाराचा मोबाईल घेवून चोरटे निजाम हाफीसाब यांच्या घराकडे वळले. त्यांच्या घरातून रोख २५० रुपये घेवून चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून दिले. एवढ्यावरच न थांबता याच परिसरातील इतर घरांच्या खिडक्या व दारे उचकटण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोरट्यांकडे धारधार शस्त्रे असल्याने त्यांचा प्रतिकार करण्यात अपयश आल्याचे नागरिकांनी सांगितले. संगम पार्कबरोबरच कासीमबाग परिसरालगत असलेल्या काही घरात घुसूनही चोरट्यांनी शस्त्रास्त्राचा धाक दाखवून लुट केल्याचे समजते. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील काही नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांवर दगडफेक करीत चोरटे पसार झाले. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करावा. तसेच चोरट्यांवर लगाम घालण्यासाठी गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Armed robbers stranded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.