सेना-भाजपच्या वादात औरंगाबादची लावली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:21 AM2018-03-09T00:21:08+5:302018-03-09T00:21:14+5:30

शहरातील कचरा प्रश्न पेटल्याचे पडसाद सलग तिस-या दिवशी विधिमंडळात उमटले. बुधवारी शहरात कच-यावरून दगडफेक, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला.

Army-BJP dispute in Aurangabad | सेना-भाजपच्या वादात औरंगाबादची लावली वाट

सेना-भाजपच्या वादात औरंगाबादची लावली वाट

googlenewsNext
ठळक मुद्देधनंजय मुंडे : सलग तिस-या दिवशी विधिमंडळात महापालिकेचा ‘कचरा’

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील कचरा प्रश्न पेटल्याचे पडसाद सलग तिस-या दिवशी विधिमंडळात उमटले. बुधवारी शहरात कच-यावरून दगडफेक, लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्ताव मांडताना महानगरपालिका बरखास्त करण्याची जोरदार मागणी केली. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या भांडणात औरंगाबादची वाट लावल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.
मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील कचºयाचा प्रश्न सत्ताधाºयांना सोडवता येत नसेल, तर या सरकारला लाज वाटली पाहिजे. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत ज्यांची सत्ता आहे, त्यांची ही जबाबदारी असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रश्नाची दखल घेऊन महापालिका बरखास्त करायला सांगितले आहे. शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही एक प्रकारची आणीबाणी निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासक नेमा अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली. या गंभीर प्रश्नाच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्यास तयार असून, शुक्रवारी चर्चा करण्यात येईल, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी उत्तरात सांगितले.
आमचे काय? यामुळे हा प्रश्न : आ. झांबड
शहरातील कचºयाचा प्रश्न हा आमचे काय? या सत्ताधारी भाजप-शिवसेना नेत्यांच्या वृत्तीमुळे निर्माण झाला आहे. महापालिकेतील पदाधिकारी बदलले की हप्ता वाढतो. यातून विविध वेळा कंपन्या नाकारण्यात आल्या आहेत. कोणताही तोडगा काढला तरी आमचे काय? या प्रवृत्तीमुळे मार्ग निघणे कठीण आहे. यासाठी ही महापालिका बरखास्त करा, अशी मागणी काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांनी विधान परिषदेत केली.
दगडफेक करणाºया पोलिसांना निलंबित करा : आ. जलील
औरंगाबाद : शहरातील कचºयाचा प्रश्न पेटला असतानाच पोलिसांनी कचºयाला विरोध करणाºया नागरिकांवर हल्ला चढवत स्वत:च गाड्यांची तोडफोड केली असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडिओतून समोर आला आहे. प्रत्येक नागरिकाला वाटते की, शहरातील कचरा माझ्या घराजवळ नको. हा नागरिकांचा हक्क आहे. मात्र, पोलिसांच्या दादागिरीने हद्द पार केली आहे. कचरा टाकण्यास विरोध करणारे नागरिक हे काही दहशतवादी नाहीत. यामुळे दगडफेक करून गाड्यांची तोडफोड करणाºया पोलिसांना निलंबित करण्याची मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी विधानसभेत केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी सरकारला चौकशीचे निर्देश दिले. गृहराज्यमंत्र्यांनी याची तात्काळ चौकशी करून सभागृहात निवेदन करणार असल्याचेही सांगितल्याचे आ. जलील म्हणाले.
‘कचºयात नगरसेवकांची पार्टनरशिप’
शहरातील कचरा उचलणारी अर्धी वाहने ही महापालिकेची आहेत. उर्वरित अर्धा कचरा उचलणाºया यंत्रणेत संबंधित वॉर्डाच्या नगरसेवकांची पार्टनरशिप आहे. हे सगळे लागेबांधे बाहेर आले पाहिजेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे, महिला बचत गटाकडे कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेला आहे. राज्यातील एकाही महापालिकेत असा प्रकार नाही. या बचत गटांचा सर्वेसर्वा संबंधित वॉर्डातील नगरसेवक आहे. कचºयासाठी आतापर्यंत नगरसेवकांनी तीन वेळा परदेश दौरे केले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे सुद्धा सांगतात की, नगरसेवकांचा धंदा बुडेल म्हणून तोडगा काढण्यात येत नाही. यामुळे ही महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी विधान परिषदेत आ. सतीश चव्हाण यांनी केली.

Web Title: Army-BJP dispute in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.