आरना चौघने तनिषाला बरोबरीत रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:37 AM2017-10-30T01:37:44+5:302017-10-30T01:37:48+5:30
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिस-या दिवशी पाचव्या फेरीत अगमानांंिकत तनिषा बोरामणीकर हिला आरना चौघ हिच्यासोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले.
जालना : येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत तिस-या दिवशी पाचव्या फेरीत अगमानांंिकत तनिषा बोरामणीकर हिला आरना चौघ हिच्यासोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले.
सिसिलियन पेलिकन प्रकाराने सुरुवात झालेल्या डावात दोघी खेळाडूंनी विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, उंट व घोडा यांच्या अंत्यपर्वात विजय संपादन करणे खूप कठीण आहे. याचा अंदाज दोघी खेळाडूंना असल्याने कोणताही धोका न पत्करता त्यांनी बरोबरीत समाधान मानले.
मुलांमध्ये पहिल्या गटांवर नागपूरचा राहुल शिंदे व कौस्तुभ माकोने यांच्यातील डाव ९४ मिसलेनिस या प्रकाराने सुरू झाला व मध्यपर्वात वर्क डिफेन्ससदृश परिस्थिती निर्माण झाली. दोघांनी बचावात्मक खेळ करीत ५४ व्या चालीला बरोबरी मान्य केली.
पाचव्या फेरीअखेर मुलांमध्ये ४.५ गुणांसह अंकित झा (ठाणे), कजुल शिंदे (नागपूर), अंश धनविज (नागपूर) व कौस्तुभ माकोणे हे आघाडीवर आहेत. तर मुलींच्या गटात तनिषा बोरामणीकर (औरंगाबाद), आखा चौघ (मुंबई) हे ४.५ गुणांसह आघाडीवर आहेत. त्याखालोखाल सीया कुलकर्णी (नाशिक), विघ साहा (मुंबई), समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर), सौख्या सावंत (ठाणे), अनुश्री बावस्कर (औरंगाबाद) या संयुक्तरीत्या द्वितीय स्थानावर आहेत.
सहाव्या फेरीच्या सुरूवातीस आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सुवर्णपदक विजेते किशोर डांगे यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पन्नालाल बगडिया, अरूण मित्तल, डॉ. शाम काबुलीवाले, डॉ.भिकूलाल सले, प्रतीक भक्त, प्रशांत नवगिरे, पंच शोभाराज खोंडे, सतीश ठाकूर, अमरीश जोशी, अभिजीत वैष्णव, केशव लहाने, रूपेश बगडिया इत्यादी उपस्थित होते.