औरंगाबादला येण्याची सोय केली,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:02 AM2021-07-20T04:02:56+5:302021-07-20T04:02:56+5:30
परतीच्या प्रवासाचा रेल्वेला विसर रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे सुरू : अप-डाऊन करणाऱ्यांसाठी नांदेड-रोटेगाव डेमूची वेळ गैरसोयीची औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या ...
परतीच्या प्रवासाचा रेल्वेला विसर
रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे सुरू : अप-डाऊन करणाऱ्यांसाठी नांदेड-रोटेगाव डेमूची वेळ गैरसोयीची
औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या तब्बल दीड वर्षांनंतर दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत सोमवारपासून अनारक्षित नांदेड - रोटेगाव आणि रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वे दाखल झाली. रोटेगाव-नांदेड डेमूचे प्रवाशांतर्फे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. परंतु, नांदेडहून रोटेगावसाठी धावणाऱ्या डेमूची वेळ प्रवाशांसाठी गैरसोयीची असल्याची ओरड होत आहे.
दीड वर्षांपासून औरंगाबादमार्गे फक्त विशेष रेल्वे होत्या. पॅसेंजर रेल्वे कधी धावणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. पॅसेंजर रेल्वे यापुढे डेमू रेल्वे म्हणून चालविण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने १६ जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर अनारक्षित प्रवासासाठी सोमवारपासून रोटेगाव - नांदेड डेमू रेल्वे सुरू झाली. लासूर स्टेशन येथे डेमूचे प्रवाशांतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, नमो रेल्वेचे अध्यक्ष गौतम नहाटा, रेल्वे सेना गोल्डन ग्रुपचे सदस्य मनीष मुथा, अक्षय वायकोस, आदी उपस्थित हाेते. या रेल्वेपाठोपाठ इतर पॅसेंजर डेमू कधी सुरू होतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
अशी होते गैरसोय
नांदेड-रोटेगाव डेमू नांदेड रेल्वे स्टेशनहून सायंकाळी ७.२५ वाजता सुटते. ही रेल्वे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर रात्री १.०५ वाजता येते आणि १.१० वाजता पुढे रवाना होते. रोटेगाव येथे पहाटे ३ वाजता रेल्वे पोहोचण्याची वेळ आहे. त्यामुळे सायंकाळी रोटेगावकडे जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होत नाही. त्यामुळे वेळ बदलण्याची मागणी होत आहे.
फोटो ओळ...
लासूर स्टेशन येथे रोटेगाव-नांदेड डेमू रेल्वेचे स्वागत करताना रेल्वे प्रवासी संघटना आणि प्रवासी.