चोरीच्या मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:04 AM2021-04-21T04:04:52+5:302021-04-21T04:04:52+5:30

साईनाथ जगन्नाथ नावकर (३० रा. घाटी सिरसगाव ता. बदनापूर जि.जालना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिडको वाहतूक ...

Arrested for putting fake number plate on stolen motorcycle | चोरीच्या मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकणारा अटकेत

चोरीच्या मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकणारा अटकेत

googlenewsNext

साईनाथ जगन्नाथ नावकर (३० रा. घाटी सिरसगाव ता. बदनापूर जि.जालना) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सिडको वाहतूक शाखेचे हवालदार कल्याण मांगीलाल चव्हाण हे अन्य अधिकारी, कर्मचारी यांच्यासह २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुकुंदवाडी बसस्टॉप येथे नाकाबंदी करीत होते. नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वार आरोपी साईनाथ नावकरला पोलिसांनी अडवले. त्याला पोलिसांनी गाडीची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याच्या दुचाकीचा इंजिन आणि चेसीस नंबरवरुन ई-चलान मशीनच्या आधारे माहिती घेतली. तेव्हा आरोपीजवळील दुचाकीचा खरा क्रमांक (एमएच २१७ - एटी १५३०) असल्याचे आढळून आले. आरोपीने दुचाकीवर औरंगाबाद पासिंगचा बनावट क्रमांक टाकून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. शिवाय ही दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा अहमदनगर जिल्ह्यात नोंद असल्याचे पोलिसांना समजले. याप्रकरणी हवालदार चव्हाण यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. फौजदार वाघ तपास करीत आहेत.

Web Title: Arrested for putting fake number plate on stolen motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.