फुग्यातून दारू विक्री करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:05 AM2021-04-21T04:05:17+5:302021-04-21T04:05:17+5:30
सोयगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाने लागू केलेल्या संचारबंदीतही थेट फुग्यातून दारू विक्री करणाऱ्याला सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे. ...
सोयगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाने लागू केलेल्या संचारबंदीतही थेट फुग्यातून दारू विक्री करणाऱ्याला सोयगाव पोलिसांनी अटक केली आहे. टाकलेल्या छाप्यात २० लिटर गावरान दारू आणि दारू तयार करण्याचे रसायन असा चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुकुंद मोरे असे अटक केलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे.
तालुक्यात संचारबंदीत अवैध गावरान दारू विक्रीवर सोयगाव पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. अवैध गावरान दारू विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच घोसला येथील अवैध दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. पाठोपाठ माळेगाव पिंपरी येथे देखील दारू बनवून तिची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यातही ही दारू विक्री फुग्यात टाकून केली जात असल्याचा अनोखा फंडा येथे समोर आला. सोयगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगावात सापळा रचून गावरान दारू विक्री व बाळगणाऱ्या मुकुंद मोरे यास रंगेहात पकडले. दारूसह चार हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई जमादार संतोष पाईकराव, संदीप चव्हाण, रोहन शिंदे, दीपक भंगाळे यांच्या पथकाने केली.
छायाचित्र ओळ - माळेगाव पिंप्री येथे दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला गेला. यावेळी पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ.
200421\ynsakal75-0330353035_1.jpg
जप्त केलेली गावरान दारूचीी विल्हेवाटलावताना पोलीस अधिकारी, कर्मचारी