अतिथी देवो भव! जी-२० परिषदेसाठी पाहुण्यांचे छत्रपती संभाजीनगरीत आगमन
By संतोष हिरेमठ | Published: February 25, 2023 05:41 PM2023-02-25T17:41:36+5:302023-02-25T17:42:03+5:30
जिल्हा प्रशासन, चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : जी-२० राष्ट्रसमूहाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत औरंगाबादेत होणाऱ्या वूमन- २० या परिषदेसाठी जणांचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. जिल्हा प्रशासन, चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, विमानतळ संचालक डी.जी. साळवे,जिल्हा परिषद मुख्याधिकारी विकास मीना उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांची विमानतळावर उपस्थिती आहे. लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. जी-२० आणि वूमन-२० परिषदेनिमित्त विमानतळावर विविध प्रकारची सजावट करण्यात आली आहे. संपूर्ण शहर लग्नघराप्रमाणे नटले आहे.