वक्तृत्वातून सांगितल्या श्रीकृष्णाच्या कला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:05 AM2021-03-16T04:05:01+5:302021-03-16T04:05:01+5:30
पूर्णकन्या, नारी फोरम, युवा फोरम या संस्थांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला. पाठक यांच्यासह पूर्णवादी शिक्षिका शोभा गोडबोले यांनी स्पर्धेचे परीक्षण ...
पूर्णकन्या, नारी फोरम, युवा फोरम या संस्थांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला. पाठक यांच्यासह पूर्णवादी शिक्षिका शोभा गोडबोले यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. चारुता हिंगे यांनी अभंग गायन केले. कलासंगम भगिनी समाज इंडियाच्या मराठवाडा विभाग प्रमुख दीपाली मुळे यांनी मान्यवरांचे स्वागत, तर मनीषा जोशी यांनी परिचय करून दिला.
संस्थेच्या औरंगाबाद शाखा अध्यक्षा अनघा चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ओघवती भाषा व अभ्यासपूर्ण गुरुसंस्कारित प्रतिपादन हे सर्व स्पर्धकांचे वैशिष्ट्य ठरले. रेणुका मोहरीर, श्रुतिका व्याहाळकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांक, तर प्रियांका कुलकर्णी, पल्लवी जहागीरदार यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. रोहिणी जोशी यांनी संचालन केले. रचना दाशरथे यांनी आभार मानले. रश्मी नागापूरकर, अमृता पालोदकर, युगंधरा जोशी, शांभवी देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.