जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 12:57 PM2024-10-02T12:57:23+5:302024-10-02T12:58:13+5:30

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल

As soon as he was released on bail, the lover again run away with the same minor girl; The girl wrote to parent, will not show my face again... | जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....'

जामिनावर सुटताच प्रियकर पुन्हा त्याच अल्पवयीन मुलीसोबत पसार; मुलीने चिठ्ठीत लिहिले,'पुन्हा....'

छत्रपती संभाजीनगर : एका २१ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला पळवून नेले. जानेवारीत त्याच्यावर बलात्कार, अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली. मात्र, जामिनावर सुटताच त्याने त्याच मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात सोमवारी करण चंद्रकांत तुरुकमाने (२१, रा. बालाजीनगर) याच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला.

तक्रारदार महिला व तिचे पती नोकरी करतात. ३० सप्टेंबर रोजी सकाळी त्यांची मोठी मुलगी घरीच होती तर दोन मुले शाळेत गेले होते. सकाळी ९.३० वाजता शेजाऱ्यांनी त्यांची मुलगी हातात कपड्यांची बॅग व साडी नेसून निघून गेल्याचे पाहिले. त्यांनी तत्काळ महिलेला कॉल करून ही माहिती दिली. महिलेने काम सोडून घर गाठले. घरातून निघताना मुलीने सर्व शैक्षणिक कागदपत्रे नेले होते. मुलीला यापूर्वी देखील जानेवारीत करण याने पळवून नेले होते. तेव्हा पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार, अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी दोघांचा शोध घेत अटक केली होती.

पुन्हा तोंड दाखवणार नाही....
तक्रारदार महिलेच्या मुलीने आईला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवत घर सोडले. त्यात ‘मम्मी माझ्याकडून मोठी चूक झाली. म्हणून मी यानंतर तुम्हाला कधीच तोंड दाखवणार नाही आणि मला शोधू पण नका. मी लग्न पण केलं आहे. झालं तर मला माफ करा’ अशी चिठ्ठी लिहिली. करण यानेच तिला पळवून नेल्याची शंका मुलीच्या आईने व्यक्त केली. तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

Web Title: As soon as he was released on bail, the lover again run away with the same minor girl; The girl wrote to parent, will not show my face again...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.