रेल्वेगाड्या रद्द होताच मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडे १ हजार १०० वरून १ हजार ७०० रुपयांवर

By संतोष हिरेमठ | Published: May 30, 2024 06:57 PM2024-05-30T18:57:20+5:302024-05-30T18:57:30+5:30

मुंबईला ये-जा करणाऱ्या ६ रेल्वे ३१ मे ते २ जूनदरम्यान रद्द

As soon as the trains are cancelled, the fare of Mumbai travels from Rs 1100 to Rs 1700 | रेल्वेगाड्या रद्द होताच मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडे १ हजार १०० वरून १ हजार ७०० रुपयांवर

रेल्वेगाड्या रद्द होताच मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडे १ हजार १०० वरून १ हजार ७०० रुपयांवर

छत्रपती संभाजीनगर : सीएसएमटी स्थानकावरील कामासाठी घेण्यात येणाऱ्या ब्लाॅकमुळे ३१ मे ते २ जूनदरम्यान मुंबईला ये-जा करणाऱ्या ६ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रद्द होताच बुधवारी १,१२० रुपये भाडे असलेल्या ट्रॅव्हल्सचे भाडे १,७२० रुपयांवर गेले. इतर ट्रॅव्हल्सनेही २०० ते ३०० रुपयांची भाडेवाढ केली आहे. मुंबईचा प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.

सीएसएमटी स्थानकावरील यार्ड आणि प्लॅटफाॅर्मच्या विस्तारासाठी नाॅन-इंटर लाॅक वर्किंग ब्लाॅक घेण्यात येत आहे. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमार्गे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेंची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी, मुंबईला जाणाऱ्या रेल्वे नेहमीच प्रवाशांनी भरून धावतात. सध्या उन्हाळी सुट्यांमुळे तर मुंबईला जाणाऱ्या रेल्वेंचे आरक्षणही मिळणे अवघड झाले आहे. उन्हाळी सुट्यांचे नियोजन करून प्रवाशांनी अनेक दिवस आधीच रेल्वेचे आरक्षण केले. मात्र, ३१ मे ते २ जूनदरम्यान मुंबईला ये-जा करणाऱ्या ६ रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रद्द होताच या कालावधीत मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचे भाडे वाढविण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेल्या रेल्वे
रेल्वे - रद्द झालेली तारीख
१) नांदेड - मुंबई तपोवन एक्स्प्रेस- ३१ मे आणि १ जून
२) मुंबई - नांदेड तपोवन एक्स्प्रेस - १ व २ जून
३) जालना - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस - १ व २ जून
४) मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेस - १ व २ जून
५) मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस- १ व २ जून
६) नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस - ३१ मे व १ जून

असे वाढले मुंबईच्या ट्रॅव्हल्सचे भाडे
बसची वेळ - २९ मे-३० मे- ३१ मे -१ जून
रात्री ८:१० वा.- १,१२० रु.-१,२२० रु.-१,५२० रु.-१,५२० रु.
रात्री ९:१० वा. -१,१२० रु.-१,३२० रु.- १,७२० रु.-१७२० रु.
रात्री ९:३० वा.-१,००० रु. - १,२२० रु.-१,५४० रु.- १,५२० रु.

Web Title: As soon as the trains are cancelled, the fare of Mumbai travels from Rs 1100 to Rs 1700

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.