नवपिढीला जीएसटी शिकविणार -अशोककुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:58 PM2018-07-01T23:58:02+5:302018-07-02T00:01:17+5:30

एक देश एक कर प्रणाली असलेला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) महती व कर भरण्याची मानसिकता नवपिढीत तयार करण्यासाठी आता महाविद्यालये व शाळेत जीएसटीची कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी) संयुक्त आयुक्त अशोककुमार यांनी केली.

Ashokkumar will teach GST to Neo-Padhi | नवपिढीला जीएसटी शिकविणार -अशोककुमार

नवपिढीला जीएसटी शिकविणार -अशोककुमार

googlenewsNext
ठळक मुद्देजीएसटीच्या पहिल्या वर्षपूर्ती सोहळ्यात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एक देश एक कर प्रणाली असलेला वस्तू व सेवा कराची (जीएसटी) महती व कर भरण्याची मानसिकता नवपिढीत तयार करण्यासाठी आता महाविद्यालये व शाळेत जीएसटीची कार्यशाळा घेण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय जीएसटीचे (सीजीएसटी) संयुक्त आयुक्त अशोककुमार यांनी केली.
देशाच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारी जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने सिडकोतील सीजीएसटी विभागाच्या इमारतीत विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य जीएसटी (एसजीएसटी)चे सहआयुक्त प्रशांत नांदेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वांच्या सहकार्याने जीएसटीची अंमलबजावणी यशस्वीरीत्या झाल्याचा उल्लेख करीत अशोककुमार म्हणाले की, देशाच्या आर्थिक विकासात हे ऐतिहासिक पाऊल होय. जीएसटीची देशात अंमलबजावणी करणे कठीण काम होते. एवढेच नव्हे तर विविध उत्पादने विविध टक्केवारीत समावेश करणे त्याहून कठीण होते; पण जीएसटी कौन्सिलने ते शक्य करून दाखविले. आजघडीला २८ टक्क्यांच्या यादीत अवघ्या ५० उत्पादनांचा समावेश राहिला आहे. जीएसटीची महती व कर का भरावा याची माहिती नवपिढीला देण्यासाठी येत्या काळात महाविद्यालय व शाळांमध्येही जीएसटी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शून्य टक्क्यांमध्ये ज्या उत्पादनांचा समावेश आहे त्यांचा एक टक्क्याच्या यादीत समावेश करावा. जास्तीत जास्त १२ टक्के कर आकारणी करावी, अशी सूचना सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी केली. उद्योजकांच्या सूचनेवरून जीएसटी विभागाने मदत केंद्र सुरूकेल्याबद्दल मसिआचे अध्यक्ष किशोर राठी यांनी सीजीएसटी व एसजीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष सरदार हरीसिंग म्हणाले की, जीएसटी लागू होण्याआधी व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, मागील वर्षभरातील यशस्वी बदल लक्षात घेता आपण विनाकारण भीती बाळगत होतो, असे व्यापाºयांना वाटत आहे. मोठ्या संख्येने नवीन करदाते वाढल्याने व्यापाºयांनी जीएसटीला सकारात्मक स्वीकार केल्याचेही त्यांनी नमूद केले. मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान म्हणाले की, जीएसटीचा व्यापाºयांना किती फायदा झाला हे सांगणे कठीण आहे; पण ई-वे-बिलमुळे मालवाहतूकदारांना मोठा फायदा झाला आहे व टोलनाके नसल्याने पैसा व वेळेची बचत होऊन मालवाहतुकीला गती आल्याचे त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
मराठवाडा चेंबर आॅफ ट्रेड अ‍ॅण्ड कॉमर्सचे अध्यक्ष प्रफुल्ल मालानी यांनी दोन सूचना केल्या. त्यात नवीन करप्रणाली असल्याने वर्षभरात रिटर्न भरताना व्यापाºयांकडून काही चुका झाल्या. त्या सुधारण्यासाठी रिवाईज रिटर्न भरण्याचे आॅप्शन जीएसटीत असावे, एक्साईज व व्हॅटचे ट्रांझिशनल क्रेडिट घेण्याची सुविधा जीएसटीमध्ये पुन्हा देण्यात यावी. या दोन मागण्या जीएसटी कौन्सिलकडे पाठविण्याचे आश्वासन अशोककुमार यांनी दिले.
उपायुक्त प्रसन्न दातार यांनी सूत्रसंचालन केले. सीजीएसटी आयुक्त श्रीकांत पाटील, उपायुक्त एस.आर.राजूरकर. एसजीएसटीचे उपायुक्त आनंद पाटील, ताजदार पठाण, सहायक आयुक्त सुजित कक्कड यांच्यासह आयसाचे अध्यक्ष समीर काननखेडकर, मराठवाडा चेंबरचे राकेश सोनी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, विजय जैस्वाल यांच्यासह अन्य व्यापारी, उद्योजक, जीएसटी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
जीएसटीचा प्रमाणपत्र कोर्स
एसजीएसटीचे सहआयुक्त प्रशांत नांदेडकर यांनी सांगितले की, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जीएसटीचा प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्यात येणार आहे. अज्ञानामुळे व्यापाºयांमध्ये जीएसटीबद्दल भीती होती ती दूर करण्यात विभाग यशस्वी झाला आहे. विवरणपत्र कसूरदारांसाठी विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Ashokkumar will teach GST to Neo-Padhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.