यंदा दिवाळीत ‘आशियाना’ महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:41 AM2018-08-26T00:41:48+5:302018-08-26T00:43:12+5:30

महापालिकेत मागील सहा महिन्यांपासून टीडीआर लोडिंग प्रक्रिया बंद आहे. टीडीआरच्या २३० संचिका शासनाकडे चौकशीसाठी पडून आहेत. त्यामुळे नवीन टीडीआर देणे, टीडीआर लोड करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांना बसला असून, बिल्डरांनी इमारतींची उंची कमी करून सुधारित बांधकाम परवानगी घेण्यावर अधिक भर दिला आहे.

'Asia' expensive in Diwali this year | यंदा दिवाळीत ‘आशियाना’ महाग

यंदा दिवाळीत ‘आशियाना’ महाग

googlenewsNext
ठळक मुद्देटीडीआर लोडिंग बंद : मोठ्या बिल्डरांनी गृहप्रकल्पांची उंची घटविली

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महापालिकेत मागील सहा महिन्यांपासून टीडीआर लोडिंग प्रक्रिया बंद आहे. टीडीआरच्या २३० संचिका शासनाकडे चौकशीसाठी पडून आहेत. त्यामुळे नवीन टीडीआर देणे, टीडीआर लोड करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा फटका शहरातील मोठ्या गृहप्रकल्पांना बसला असून, बिल्डरांनी इमारतींची उंची कमी करून सुधारित बांधकाम परवानगी घेण्यावर अधिक भर दिला आहे. दिवाळीत असंख्य नागरिक आपल्या हक्काचा ‘आशियाना’ खरेदी करतात. सरासरी दरापेक्षा किमान दहापट अधिक रक्कम देऊन नागरिकांना घरे खरेदी करावी लागणार आहेत.
महापालिकेतील टीडीआर घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीने महापालिकेने दिलेल्या टीडीआरच्या सर्व संचिका मागवून घेतल्या. त्यामुळे नवीन टीडीआरची नोंद करण्यासाठी मनपाकडे रजिस्टर नाही. जुने टीडीआर एखाद्या बिल्डरला लोड करायचे असेल तर त्यालाही मनपा नकार देत आहे. जुने रेकॉर्ड असल्याशिवाय नवीन टीडीआर लोड करणे अशक्य असल्याचे मनपाचे मत आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी फाईल परत पाठवा, अशी शासन दरबारी मागणी केली. मात्र, आतापर्यंत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही.
दिवाळीमध्ये घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल या आशेवर अनेक बिल्डरांनी प्रकल्पांची आखणी केली. एफएसआय वापरूनही काही बिल्डरांनी टीडीआर वापरण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यादृष्टीने त्यांनी बांधकाम परवानग्या घेतल्या होत्या.
मागील सहा महिन्यांपासून नवीन टीडीआरच लोड होत नसल्याचे बिल्डरांनी गृहप्रकल्पांची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद शहराच्या विकासाला खीळ
टीडीआर लोड करण्याच्या किमान ४० पेक्षा अधिक फाईल महापालिकेत पडून आहेत. सहा महिन्यांपासून ही प्रक्रिया ठप्प असल्याने विकासाला खीळ बसली आहे. महापालिकेलाही कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. महापालिका टीडीआर लोड करीत नसल्याने अनेक व्यावसायिकांनी गृहप्रकल्पांची उंची कमी केली. त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. नागरिकांना घरे महाग मिळतील. - रवी खिंवसरा, अध्यक्ष, क्रेडाई
लवकरच तोडगा निघणार
नवीन टीडीआर देणे, जुने टीडीआर लोड करणे यासंदर्भात प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे. लवकरच नवीन रजिस्टर तयार करून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मागील सहा महिन्यांपासून टीडीआरची प्रक्रिया ठप्प झाली, ही वस्तुस्थिती आहे. आठ दिवसांत या गंभीर प्रश्नावर मार्ग काढण्यात येणार आहे.
-नंदकुमार घोडेले, महापौर

Web Title: 'Asia' expensive in Diwali this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.