७ हजार हजार रुपये लाच मागितली; हवालदारासह ॲपेचालकावर एसीबीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 07:49 PM2021-01-30T19:49:21+5:302021-01-30T19:50:10+5:30

तक्रारदार तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने करमाड ठाण्यात छळाची तक्रार नोंदविली होती.

Asked for a bribe of Rs 7,000; ACB's offense against the driver along with the constable | ७ हजार हजार रुपये लाच मागितली; हवालदारासह ॲपेचालकावर एसीबीचा गुन्हा

७ हजार हजार रुपये लाच मागितली; हवालदारासह ॲपेचालकावर एसीबीचा गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देआरोपी हवालदार करमाड ठाण्यात कार्यरत

औरंगाबाद: पत्नीचा छळ केल्याच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे ७ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या करमाड ठाण्यातील हवालदारासह त्याच्यासाठी तक्रारदाराकडे लाचेचा तगादा लावणाऱ्या रिक्षाचालकाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला.

पोलीस हवालदार सिराज इकबाल पठाण आणि ॲपेरिक्षाचालक युवराज नाथा मुळे अशी आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने करमाड ठाण्यात छळाची तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार सिराज पठाण आणि रिक्षाचालक यांनी एकत्रित ७ हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी वेळोवेळी सापळा रचला मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडुन लाच घेतली नाही. यामुळे दोन्ही आरोपीविरूध्द एसीबीने लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविला.

Web Title: Asked for a bribe of Rs 7,000; ACB's offense against the driver along with the constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.