पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार सहायकाच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:33 PM2019-05-07T23:33:45+5:302019-05-07T23:34:13+5:30
येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. चोले यांची येथील पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून करमाड येथील नियुक्ती असून, ते दोन वर्षांपासून पिशोर येथे प्रतिनियुक्तीवर असल्याने येथील दवाखान्याच्या कारभार सहायकाच्या हाती आहे.
करमाड : येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. चोले यांची येथील पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून करमाड येथील नियुक्ती असून, ते दोन वर्षांपासून पिशोर येथे प्रतिनियुक्तीवर असल्याने येथील दवाखान्याच्या कारभार सहायकाच्या हाती आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ मध्ये असून या दवाखान्यांतर्गत करमाड, सटाणा, मंगरूळ, हिवरा, जडगाव, लाडगाव, भांबरडा, दुधड, जयपूर बनगाव,गेवराई कुबेर आदी गावे येतात. दोन वर्षांपासून येथे एक सहायक पशुधन अधिकारी, एक ड्रेसर व एका शिपायावर काम चालविण्यात येत आहे.
येथील डॉक्टर बाहेरगावी व्हिजिटवर गेल्यानंतर दवाखान्यात पशुमालकांना तासन्तास दवाखान्यात प्रतीक्षा करावी लागते. दुष्काळी परिस्थिती असताना दुधड, भांबरडा, जयपूर, बनगाव व गेवराई कुबेर येथे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. वेळेवर डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांना खाजगी डॉक्टरांना बोलावून जनावरांवर उपचार करून घ्यावे लागत आहेत. पशुपालकांची होत असलेली हेळसांड दूर करून प्रतिनियुक्तीवर असलेल्या पशुधन विकास अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. जिजा कोरडे यांनी केली आहे.