बंडोबांवर आश्वासनांची खैरात

By Admin | Published: January 17, 2016 11:53 PM2016-01-17T23:53:42+5:302016-01-17T23:57:11+5:30

औरंगाबाद : नवीन शहराध्यक्षाच्या निवडीआधी भाजपमध्ये उठलेले अंतर्गत वादळ अखेर शमले. त्यासाठी प्रदेशाध्यक्षांसह निरीक्षकांनीही इच्छुकांची समजूत काढली.

Assurance of bailouts on Bandobote | बंडोबांवर आश्वासनांची खैरात

बंडोबांवर आश्वासनांची खैरात

googlenewsNext

औरंगाबाद : नवीन शहराध्यक्षाच्या निवडीआधी भाजपमध्ये उठलेले अंतर्गत वादळ अखेर शमले. त्यासाठी प्रदेशाध्यक्षांसह निरीक्षकांनीही इच्छुकांची समजूत काढली. यावेळी काही जणांना येत्या काळात न्याय देण्याचे आश्वासनही दिले गेल्याचे कळते.
भाजपमध्ये शहराध्यक्षपदासाठी यंदा पहिल्यांदाच जबरदस्त रस्सीखेच सुरू होती. स्थानिक आमदार अतुल सावे, कामगार मोर्चाचे संजय केणेकर, पक्षाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, मनपातील स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, माजी उपमहापौर संजय जोशी, विजय साळवे आदींनी या पदासाठी इच्छा व्यक्त केली होती; परंतु ऐनवेळी माजी किशनचंद तनवाणी यांचे नाव पुढे आले. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. सेनेतून भाजपमध्ये नव्याने आलेल्या तनवाणींविरोधात सर्व जुने पदाधिकारी एकवटले, त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे धाव घेऊन आपला विरोधही दर्शविला. हा विरोध लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेवरून गुरुवारची शहराध्यक्ष निवडीची बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर गेले दोन दिवस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तनवाणींच्या नावावर एकमत घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न
शहराध्यक्षपदी तनवाणी
औरंगाबाद : पक्षातील जुन्या नेत्यांची समजूत काढण्यात यश मिळाल्यानंतर रविवारी भाजपच्या शहराध्यक्षपदी माजी आ. किशनचंद तनवाणी यांची निवड जाहीर झाली. तनवाणी यांची निवड जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर फटाके वाजवून जल्लोष केला. स्थानिक पातळीवर शिवसेनेला शह देण्यासाठीच तनवाणी यांची शहराध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पक्षाच्या कार्यालयात सकाळी १० वाजता निरीक्षक आ. सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर देशमुख यांनी तनवाणी यांच्या नावाची घोषणा केली.
यावेळी मावळते शहराध्यक्ष बापू घडामोडे, संजय केणेकर, डॉ. भागवत कराड, उपमहापौर प्रमोद राठोड, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, विजय साळवे, माजी उपमहापौर संजय जोशी, नगरसेविका माधुरी अदवंत, गजानन बारवाल, नितीन चित्ते, राज वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

Web Title: Assurance of bailouts on Bandobote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.