लासूरला नवीन पोलीस ठाणे देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:21 AM2018-07-03T00:21:26+5:302018-07-03T00:21:50+5:30

गृहराज्यमंत्री : ग्रामस्थ व व्यापाऱ्यांशी साधला संवाद

 Assurance of giving new police stations to Lasur | लासूरला नवीन पोलीस ठाणे देण्याचे आश्वासन

लासूरला नवीन पोलीस ठाणे देण्याचे आश्वासन

googlenewsNext

लासूर स्टेशन : चार महिन्यानंतर आले अन् नव्या पोलीस ठाण्याचे आश्वासन देऊन निघून गेले, असे वर्णन राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या सोमवारी लासूर स्टेशन येथे झालेल्या दौºयाचे करता येईल. येथे गेल्या काही महिन्यांत घडलेल्या खून व दरोड्याच्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री केसरकर हे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरून ही घोषणा केली.
लासूर स्टेशन येथे गेल्या चार महिन्यांपूर्वी खून, दरोडा व चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत आ. सुभाष झांबड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या अनुषंगाने सोमवारी केसरकर यांनी येथील जैन मंगल कार्यालयात येऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन संवाद साधला.
व्यासपीठावर आ. प्रशांत बंब, जि.प. अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, पंचायत समितीचे उपसभापती संपत छाजेड, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक उज्वला वनकर, सरपंच रश्मी जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या काही महिन्यात चोरट्यांनी लासूर स्टेशनमध्ये धुमाकूळ घातल्याने व खून, दरोड्याच्या घटनांनी व्यापाºयांत व ग्रामस्थांत मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीने जोर धरला होता. त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी लासूरसाठी लवकरच नवीन पोलीस ठाणे मंजूर करून भूमिपूजनासाठी मी स्वत: येईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, पोलीस अधिकाºयांच्या बैठकीत पोलीस कर्मचाºयांच्या भौतिक सुविधेवर अधिकाºयांनी भर देण्याची सूचनाही केसरकर यांनी केली.
मुख्यमंत्र्यानंतर गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन
४ मार्च रोजी लासूर भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लासूर स्टेशन येथे लवकरच नवीन पोलीस ठाणे मंजूर करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही या घोषणेचा पुनरुच्चार केल्याने लासूर स्टेशन येथे लवकरच नवीन पोलीस ठाणे होईल, अशी अपेक्षा नागरिकांना वाटत आहे.

Web Title:  Assurance of giving new police stations to Lasur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.