वायू प्रदूषणामुळे बळावतो अस्थमा
By Admin | Published: May 3, 2016 01:02 AM2016-05-03T01:02:31+5:302016-05-03T01:07:29+5:30
परभणी : वाढलेली वाहनसंख्या, वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण, धूळ, धूर यामुळे अस्थमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते.
परभणी : वाढलेली वाहनसंख्या, वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण, धूळ, धूर यामुळे अस्थमा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. १० वर्षाच्या आतील वयोगटात व वयोवृद्धांना अस्थम्याचा आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो.
३ मे रोजी सर्वत्र जागतिक दमा दिन साजरा होत आहे. श्वासाचा वेग वाढून श्वासाद्वारे काहीसा आवाज येण्याची प्रक्रिया सुरु झाल्यास, दम लागल्यास व झोपल्यावर श्वास घेताना त्रास होणे, चालताना, काम करताना धाप लागणे, खोकला, झोपल्यावर त्रास वाढणे आदी लक्षणे ही आढळून येतात. असे लक्षणे ज्यांना आढळून येतात त्यांना दमा आजार होतो. यासाठी सध्याची बदलती जीवनशैली, अॅलर्जी, अनुवंशिकता या गोष्टी कारणीभूत आहेत. थंड व कफ वाढविणारा आहार, विहार, वातावरणातील बदल, अतीश्रम व सततच्या सर्दीकडे दुर्लक्ष, इतर आजारांमुळे क्षय, फुस्फुस व श्वसन नलिका, जंतू संसर्ग व आजार, व्यसनामुळे, या आजारात अनुवंशिकताही आढळून येते.
एकूण लोकसंख्येच्या ६ ते ७ टक्के लोकांना दमा होण्याची शक्यता असल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. विशेषत: लहान मुलांना दहा वर्षाच्या आत दमा होण्याची शक्यता असते. वयोवृद्धांनाही दमा होण्याची भीती असते.
४कारणे: थंड व कफ वाढविणारा आहार, व्यसन, अतिश्रम, सतत सर्दीकडे झालेले दुर्लक्ष.
४निदान : नाडी परीक्षा, श्वास गती, सीबीसी, ईएसआर, एक्स-रे, पीकफ्लो मीटर रिडींग, लंग फंक्शन टेस्ट या तपासणीद्वारे आजाराचे निदान करता येते.