अट्टल घरफोड्या जाळ्यात
By Admin | Published: September 20, 2014 11:29 PM2014-09-20T23:29:39+5:302014-09-21T00:29:57+5:30
बीड: केज तालुक्यातील नांदोली येथे घरफोडी करणारा आरोपी दरोडा प्रतिबंध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी पकडला़ त्याची कसून चौकशी सुरू आहे़
शेख जावेद शेख इस्माईल असे त्या आरोपीचे नाव असून तोही नांदोली येथीलच आहे. केज तालुक्यातील नांदोली येथील रामेश्वर लिंबराज बावळे यांच्या घरात ११ सप्टेंबर रोजी चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्याने घरातील एक लाख रुपयांची नगदी रोख रक्कम व बारा हजार रुपयांचे गठंन चोरी केले होते़ गुन्हा दाखल झाल्यानंतर दरोडा प्रतिबंधक विभागाने तपास सुरु केला.संशयावरून शेख जावेद यास ताब्यात घेतले. त्याने गुन्हा कबुल केला तसेच मुद्देमाल सांगितला. त्याने सांगितलेल्या ठिकाणाहून नव्वद हजार रुपये व बारा हजार रुपये किमतीचे गंठण पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त केले. त्याने दहा हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले.
ही कारवाई अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, पो़नि़शेवगण यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय भारत राऊत, हे़ काँ़ मोहन क्षीरसागर, संजय खताळ, बबन राठोड, पोना गणेश दुधाळ, लक्ष्मण जायभाय, बाळासाहेब सुरवसे, महिला पोलीस माया साबळे, चालक रशीद खान यांनी केली़ (प्रतिनिधी)