‘एटीएम’चे शटर डाऊन !
By Admin | Published: November 15, 2016 12:43 AM2016-11-15T00:43:51+5:302016-11-15T00:41:01+5:30
लातूर : हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे एटीएममध्येही नवीन नोटांचा पुरवठा होत नाही
लातूर : हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे एटीएममध्येही नवीन नोटांचा पुरवठा होत नाही. त्यातही आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच एटीएम शटर बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय झाली.
हजार व पाचशेच्या नोटा चलनातून रद्द झाल्याने बँकांनी जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी स्वतंत्र काऊंटर केले. पण सोमवारी बँका बंद होत्या. त्यामुळे सुविधा मिळू शकली नाही. आरबीआयकडून पुरविले जाणारे चलन पुरेसे नसल्याने एटीएममध्ये खडखडाट आहे. काही जणांनी गेल्या चार दिवसांमध्ये बँकांमध्ये स्लीप भरून ४ हजार रुपये उचलले. परंतु, एटीएमची सुविधा अद्याप सुरू नाही. सोमवारी तर शहरातील सर्वच एटीएमचे शटर डाऊन झाले होते. त्यामुळे ग्राहकांची त्रेधातिरपट झाली.