एटीएमधारकांनो, पीन कोड द्याल तर फसाल !
By Admin | Published: October 18, 2014 11:48 PM2014-10-18T23:48:17+5:302014-10-18T23:48:17+5:30
बीड : एसबीएच, एसबीआय बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातून बोलत आहे़़क़ृपया आपला एटीएमचा पीनकोड सांगा़़़़अन्यथा तुमचे एटीएम ब्लॉक होई
बीड : एसबीएच, एसबीआय बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयातून बोलत आहे़़क़ृपया आपला एटीएमचा पीनकोड सांगा़़़़अन्यथा तुमचे एटीएम ब्लॉक होईल़़़अशी बतावणी करून एटीएमधारकांकडून गुप्त माहिती जाणून ग्राहकांची फसवणूक करण्याचा गोरखधंदा काही जणांनी सुरू केला आहे़
एसबीएच आणि एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतांश ग्राहकांकडे एटीएमकार्ड आहेत़ बीड जिल्ह्यातील अशा ग्राहकांना मागील काही दिवसांपासून काही अनोळखी नंबरवरून कॉल केला जात आहे़ आणि तुमच्या एटीएमकार्डची वैधता संपत आली आहे़ तेव्हा पुढे चालू ठेवण्यासाठी माहिती द्या, अशी बतावणी करून गुप्त माहिती मिळवली जात आहे़ शनिवारी बीड शहरातील अशोक बादाडे यांना ९९३९६६०५३२ या क्रमाकांवरून असाच कॉल आला़ त्यांनी नाव विचारले असता ते सांगणे टाळले़ माझे मित्र पीएसआय आहेत, असे सांगताच कॉल कट केला़ अशी कुठलीही माहिती बँका ग्राहकांकडून जाणून घेत नाही, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)