औरंगाबादेत ८वर्षीय बालिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:51 PM2018-07-16T23:51:27+5:302018-07-16T23:52:03+5:30

आजोबाला भेटण्यासाठी आलेली ८ वर्षीय बालिका घरात झोपलेली असताना एका २२ वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगरात रविवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी पसार आहे.

Atrocities on 8-year-old girl in Aurangabad | औरंगाबादेत ८वर्षीय बालिकेवर अत्याचार

औरंगाबादेत ८वर्षीय बालिकेवर अत्याचार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आजोबाला भेटण्यासाठी आलेली ८ वर्षीय बालिका घरात झोपलेली असताना एका २२ वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उस्मानपुरा परिसरातील छोटा मुरलीधरनगरात रविवारी (दि.१५) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपी पसार आहे.
गुड्डू प्रताप रिडलॉन (२२, रा. छोटा मुरलीधरनगर), असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही लासूर येथील रहिवासी आहे. तिचे माहेर छोटा मुरलीधरनगरात आहे. रविवारी रात्री ८ वर्षीय पीडिता तिची आई आणि बहिणीसह आजोबाला भेटण्यासाठी छोटा मुरलीधरनगरात आली. त्यांनी आजोबाच्या घरी जेवण केले. पीडितेचे आजोबा शेजारी राहणाऱ्या तिच्या चुलत आजोबाच्या घरी झोपण्यासाठी गेले. त्यानंतर पीडिता, तिची बहीण आणि आई झोपले. रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास पीडितेची आई शौचासाठी शेजारी राहणाºया चुलत्याच्या घरी गेली. त्यांनी मुली झोपलेल्या घराचे दार लोटून घेतले. त्याचवेळी आरोपी गुड्डूने संधी साधली आणि घरात घुसून आठवर्षीय बालिकेवर अत्याचार केला. ती रडू लागली. तेव्हा त्याने तिला धमकावले. त्याचवेळी पीडितेची आई घरी परतली. तिला आरोपी ‘त्या’ अवस्थेत तेथे दिसला. त्यांनी आरोपीला शिव्यांची लाखोळी वाहत त्याच्या कानशिलात लगावली. त्याला त्या पकडत असताना आरोपी त्यांच्या हाताला झटका देऊन तेथून पसार झाला. मुलीने रडतच झालेल्या प्रकाराची माहिती आईला सांगितली. पीडितेच्या मातेने लगेच उस्मानपुरा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध बलात्काराची फिर्याद नोंदविली.

Web Title: Atrocities on 8-year-old girl in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.