हिवºयात विधवेला धमकी देत अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 12:15 AM2017-08-27T00:15:37+5:302017-08-27T00:15:37+5:30
पतीच्या निधनानंतर एका महिलेशी नात्यातील तरुणानेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यात ती गर्भवती राहून मुलाला जन्म दिल्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : पतीच्या निधनानंतर एका महिलेशी नात्यातील तरुणानेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. यात ती गर्भवती राहून मुलाला जन्म दिल्यानंतर त्याने लग्नास नकार दिल्याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथील एका ३५ वर्षीय विधवा महिलेने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली आहे. सदर महिलेचा पती दोन वर्षांपूर्वी मरण पावला. त्यानंतर शेजारच्याच नात्यातील तरूणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सदर महिलेने नकार दिला, त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याच्या व गावातून हाकलून देण्याच्या धमक्या देवून मागील दोन वर्षांपासून जबरदस्तीने शारीरिक संंबंध ठेवून सतत अत्याचार केला. यादरम्यान सदर पिडीत महिला गरोदर राहिली. तिला प्रसुतीकरिता नांदेडच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले असता २२ आॅगस्ट रोती तिने पुरूष जातीच्या अर्भकाला जन्म दिला. पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल वामन लोणे याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७६, २(एन), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि व्यंकटराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सविता बोधनकर करीत आहेत.