लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:03 AM2021-05-06T04:03:22+5:302021-05-06T04:03:22+5:30

आकाश कोंडीराम जाधव (३०, रा.खराडी,पुणे, मूळ रा.इंदापूर सावंगी, ता.खुलताबाद,) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार पीडिता शहरात खासगी नोकरी ...

Atrocities on young women in the lure of marriage | लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

googlenewsNext

आकाश कोंडीराम जाधव (३०, रा.खराडी,पुणे, मूळ रा.इंदापूर सावंगी, ता.खुलताबाद,) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदार पीडिता शहरात खासगी नोकरी करते. तिच्या नातेवाइकांच्या लग्नात आरोपीची आणि तिची २०१६ साली भेट झाली होती. तेव्हा त्यांनी परस्परांचे मोबाइल घेतले होते. यातून त्यांची मैत्री आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या दरम्यान आरोपी औरंगाबादेत तिला भेटायला आला होता. तेव्हा त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून शहरातील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला. यानंतर, त्याने तिला पुणे, महाबळेश्वर आदी ठिकाणी फिरायला नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला दिलेले लग्नाचे वचन तोडून त्याने मार्च महिन्यात दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले, तेव्हापासून तो तिला टाळू लागला. तिचे फोन कॉल घेत नव्हता. ही बाब पीडितेला खटकली. तिने अधिक चौकशी केल्यावरच त्याने लग्न केल्याचे तिला कळाले. पीडितेने काल सिटीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी आकाशविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला. फौजदार सय्यद बाबर हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Web Title: Atrocities on young women in the lure of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.