हल्लाबोलचा धसका; औरंगाबादची नियोजन बैठकच रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:07 AM2018-02-03T00:07:48+5:302018-02-03T00:08:05+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाºया नियोजन विभागाच्या बैठकीला ब्रेक लागला आहे. आता ही बैठक सोमवारी होणार असून, हल्लाबोलच्या धसक्यामुळे अर्थमंत्र्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला की काय, अशी चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शनिवारी होणाºया नियोजन विभागाच्या बैठकीला ब्रेक लागला आहे. आता ही बैठक सोमवारी होणार असून, हल्लाबोलच्या धसक्यामुळे अर्थमंत्र्यांचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला की काय, अशी चर्चा आहे.
सोमवारी दुपारी १२ वा. औरंगाबाद, १ वा. जालना, १.३० वा. बीड, २.१५ वा. परभणी, ४ वा. उस्मानाबाद, ४.४५ वा. लातूर जिल्हा, ५.३० वा. हिंगोली जिल्हा, ६ वा. नांदेड जिल्ह्यातील नियोजनाचा ते आढावा घेतील. सायंकाळी ७ वा. मराठवाडा विकास मंडळाच्या सदस्यांशी ते चर्चा करतील.
११०० बंधारे दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतील निधीतून तरतूद व्हावी. २० हजार एकर क्षेत्रावर तुतीच्या लागवडीसाठी जिल्हानिहाय ५ ते १० कोटींचे अनुदान मिळावे. याबाबत अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे. पर्यटन विकास, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांना प्रशिक्षणासाठी तरतूद? याबाबतच्या प्रस्तावावर अर्थमंत्र्यांशी चर्चा केली जाईल.
ज्या कामांसाठी तरतूद आहे, तो निधी मिळालाच पाहिजे. शिवाय ज्या कामासाठी निधी देता येत नाही, त्याला नविनीकरण योजनेत सामावून निधी द्यावा. तुतीच्या लागवडीसाठी १० हजार एकर क्षेत्र मनरेगातून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. २० हजार एकर क्षेत्र तुती लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय ५ ते १० कोटींचे अनुदान मिळावे. यासाठी प्रशासन बैठकीत पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
राष्ट्रवादीचा आज हल्लाबोल मोर्चा
सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हल्लाबोल यात्रा सुरू केली. या यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात नुकताच संपन्न झाल्यानंतर यात्रेचा समारोप पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.३) होत आहे. सकाळी ११ वाजता क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर सभा घेऊन दुसºया टप्प्याची सांगता होईल.
या मोर्चासाठी माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, खा. सुप्रियाताई सुळे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आमदार सतीश चव्हाण यांनी केले.